मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे २१ ऑक्टोबर १९९५ रोजी, झी मीडियाच्या स्टुडिओत आले होते, आप की अदालत या कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी यांनी, अनेक वादग्रस्त मुद्यांवरील प्रश्नांवर सरळ उत्तरं दिली. हा व्हिडीओ आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अटल बिहारी यांनी यावेळी इंदिरा गांधी तसेच आपल्या कविता आणि राजकारण यांच्यावर परखड भाष्य केलं आहे. अटलजींनी राजकारणात आल्यानंतर कवितेपासून दूर गेल्याचं म्हटलं होतं, मला कवीतेच्या जगात परतायचंय, पण राजकारण सोडून मी कवितेच्या जगात मुशाफिरी केली तर हा पलायनवाद मानला जाईल, असंही अटलजींनी स्पष्ट केलं होतं.