एबीबी इंडियाचा चौथ्या तिमाहीत नफा वाढला, कमाईत दुप्पट वाढ
यामध्ये 4.2 कोटींनी वाढ होऊन 6.5 कोटी पर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे.
नवी दिल्ली : एबीबी इंडियाच्या चौथ्या तिमाहीत चांगले परिणाम दिसून आले. डिसेंबर 2018 मध्ये संपलेल्या तिमाहीत एबीबी इंडियाची वार्षिक उत्पन्नात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वार्षिक आधारावरील फायदा पाहता यामध्ये 4.2 कोटींनी वाढ होऊन 6.5 कोटी पर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे.
उत्पन्नात 15 टक्क्यांची उसळी
कंपनीच्या उत्पन्नात जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. 2017 च्या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीला 1709 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. तर 2018 च्या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीला 1966 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवण्यात आले.
ऑर्डरमध्ये वाढ
कंपनीच्या चौथ्या तिमाहीतमधील ऑर्डरमध्ये भरघोस वाढ झालेली पाहायला मिळाली. कंपनीच्या वार्षिक ऑर्डर उसळी पाहायला मिळत आहे. यामध्ये विशेषत: इंफ्रा आणि ट्रांसपोर्टेशन सेक्टरमध्ये वाढ पाहायला मिळाली.
एबिटा आणि मार्जिनमध्ये सुधार
कंपनीच्या एबिटाबद्दल बोलायचे झाल्यास चौथ्या तिमाहीमध्ये एबिटा वार्षिक आधारावर 131 कोटींनी वाढून 180 कोटी रुपये झाला. एबिटा मार्जिनमध्ये फायदा पाहायला मिळतोय. गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 7.7 टक्क्यांच्या तुलनेत कंपनीने 2018 साली चौथ्या तिमाहीमध्ये एबिटा मार्जिन 9.1 टक्के राहीले.