ABVP Leader Held For Sharing Obscene Videos Of Women: कर्नाटकमधील शिवमोगा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीच्या विद्यार्थी नेत्याचे (ABVP Leader) अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या नेत्याला अटक करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांना मेसेंजरच्या माध्यमातूनही हा व्हिडीओ पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


तरुणींसोबत चाळे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एबीव्हीपीचा हा विद्यार्थी नेता तरुणींसमोर चाळे करत असतानाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवमोगा येथील तीर्थहल्लीमधील एबीव्हीपीच्या विद्यार्थी नेत्याला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईनंतर लोकांनी हा व्हिडीओ फॉरवर्ड करु नये असं आवाहन केलं आहे. अशाप्रकारे व्हिडीओ फॉरवर्ड करणारेही कायदेशीर कारवाईसाठी पात्र ठरतात. त्यामुळेच हे असले व्हिडीओ व्हायरल करु नये अन्यथा माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.


त्याच्याच मोबाईलवरुन शेअर केले व्हिडीओ


तीर्थहल्लीमधून अटक करण्यात आलेल्या एबीव्हीपीचा नेता आणि भाजपा कार्यकर्त्याचं नाव प्रतीक गौडा असं आहे. प्रतीक हा येथील स्थानिक स्तरावरील तरुण नेत्यांपैकी एक आहे. प्रतीकने अनेक तरुणींना अश्लील व्हिडीओ कॉल केले होते. प्रतीकने या मुलींना केलेले व्हिडीओ कॉल्स रेकॉर्ड केले. त्यानंतर प्रतीकच्याच मोबाईलवरुन हे अश्लील व्हिडीओ पहिल्यांदा लिक झाले. हे व्हिडीओ प्रतीकच्याच मोबाइलवरुन शेअर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रतीकच्या मोबाईलवरुन हे व्हिडीओ व्हायरल होण्यास सुरुवात झाल्यानंतर हे व्हिडीओ सर्व जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने पसरले आणि याची दखल थेट विद्यार्थी संघटनांनी घेत पोलिसांकडे धाव घेतली.


तरुणींना करत होता ब्लॅकमेल


तीर्थहल्ली येथील नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या म्हणजेच एनएसयूआयच्या युनिटने प्रतीक गौडाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. प्रतीकविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी एनएसयूआयकडून करण्यात आली आहे. प्रतीक या मुलींना रेकॉर्ड करण्यात आलेल्या अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत होता, असा आरोपही एनएसयूआयकडून करण्यात आला आहे.


तपास सुरु


पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात शिवमोगा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणींबरोबर अश्लील चाळे करत असलेल्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आम्ही या मुलाला अटक केली असून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. इतरही काही मुलींबरोबर यापूर्वी प्रतीकने असं कृत्य केलं आहे का, नेमका यामागील उद्देश काय होता यासारख्या गोष्टींचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. या प्रकरणामध्ये विद्यार्थ्या संघटनांनी संताप व्यक्त करत प्रतीकला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.