`वॅलेंटाइन डे`च्या दिवशी एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर अॅसिड हल्ला
`वॅलेंटाइन डे` हा दिवस प्रत्येकासाठी एक खास असतो. यादिवशी कुणीही आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करतं. मात्र, याच दिवशी जयपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे.
नवी दिल्ली : 'वॅलेंटाइन डे' हा दिवस प्रत्येकासाठी एक खास असतो. यादिवशी कुणीही आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करतं. मात्र, याच दिवशी जयपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
'वॅलेंटाइन डे'च्याच दिवशी एका तरुणाने विवाहित महिलेवर अॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन महिलांसोबत आरोपीही जखमी झाला आहे.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जयपूरमधील ट्रायटन मॉलमध्ये एका व्यक्तीने विवाहित महिलेवर अॅसिड फेकलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. या फुटेजमध्ये आरोपीला मॉलमधील उपस्थित नागरिक मारहाण करत असल्याचंही दिसत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरोपी मेहबूब हा एक रिक्षा चालक आहे. तर पीडित विवाहित महिला त्याच्या शेजारीच राहत असून ट्रायटन मॉलमध्ये नोकरी करते. आरोपी मेहबूब याचं पीडित महिलेवर प्रेम होतं आणि लग्न करण्यासाठी त्याने पीडित महिलेला विचारलं.
विवाहास नकार दिल्याने अॅसिड हल्ला
पीडित महिलेने मेहबूबला लग्न करण्यास नकार दिल्याने संतप्त आरोपीने अॅसिड फेकलं. या घटनेत पीडित महिलेसोबत आणखीन एक महिला आणि आरोपीही जखमी झाला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
या हल्ल्यात पीडित महिला १५% भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, आरोपी मेहबूबला स्थानिक नागरिक आणि सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केलं आहे.