Activa 125 H-Smart : वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात Honda Motorcycle and Scooter India ने  H-Smart टेक्नॉलॉजी असलेली  Activa 6G  स्कूटर लाँच केली होती. यानंतर आता Honda कंपनीने 6G चे अपग्रेड व्हर्जन असलेली Activa 125 H-Smart ही स्कूटर लाँच केली आहे. ही  स्कूटर चावी शिवाय स्टार्ट होणार आहे. लेटेस्ट फिचर्ससह कंपनीने यात रिमोट स्टार्टचे देखील ऑप्शन दिले आहे.


पार्क केलेली स्कूटर शोधायची गरज नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Activa H-Smart प्रमाणे, Activa 125 H-Smart ला अनेक वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रॉनिक कीचे देखील फिचर देण्यात आले आहे. यामध्ये SmartFind फीचर देखील देण्यात आले आहे. या फिचरमुळे ब्लिंकिंग इंडिकेटरद्वारे तुम्हाला तुमची स्कूटर कुठे पार्क केलेय याबाबत महिती मिळेल. स्मार्टस्टार्ट फीचरमुळे तुम्हाला खिशात चावी घेऊन फिरायची गरज नाही. रिमोटच एक बटन दाबलं की स्कूटर स्टार्ट होईल. 


अँटी-थेफ्ट सिस्टम


Activa 125 हे लेटेस्ट व्हर्जन असून स्कूटर अधिक स्मार्ट झाली आहे. स्मार्ट-की फीचर मिळवणारी ही सेगमेंटमधील पहिली स्कूटर आहे. एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह डिझाइन केलेली स्कूटर  ड्रायव्हिंगचा देखील वेगळाच अनुभव देते. प्रवासादरम्यान स्कूटरच्या डिस्प्लेवर  रिअल टाइम अपडेट मिळते. या स्कूटरचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे अँटी-थेफ्ट सिस्टम. स्कूटर पार्क केल्यानंतर दोन मीटर दूर जाताच, इमोबिलायझर फंक्शन Activate होते. यामुळे स्मार्ट-की लॉक फिचर ऑन होते.  स्मार्ट कीमुळे स्कूटरची सीट, फ्यूएल कॅप, हँडल इत्यादी सहजपणे लॉक  आणि  अनलॉक करू शकता. 


Activa 125 H-Smart चे बेस्ट फिचर्स आणि किंमत


  • लांबी - 1850 मिमी

  • रुंदी - 707 मिमी

  • उंची - 1170 मिमी

  • व्हीलबेस - 1260 मिमी

  • ग्राउंड क्लीयरन्स - 162 मिमी

  • इंधन टाकी - 5.3 लीटर

  •  4 स्ट्रोक 124cc इंजिन असून ते 6.11kW ची पॉवर आणि 10.4 Nm टॉर्क जनरेट करते.

  • PGM-Fi टेक्नॉलॉजीमुळे स्कूटरचे मायलेज सुधारण्यास मदत होते.

  • ग्रे मेटॅलिक, मिडनाईट ब्लू मेटॅलिक, पर्ल नाइट स्टार ब्लॅक, सेलेन सिल्व्हर मेटॅलिक आणि रिबेल रेड मेटॅलिक या पाच रंगात उपलब्ध.

  • Activa 125 H-Smart स्कूटरची किंमत 88,093 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.