Adani प्रकरणाचा LIC ला मोठा फटका! LIC च्या शेअर्समध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण
LIC Shares: एलआयसीमध्ये अदानी समुहाची गुंतवणूक असून हिंडनबर्ग अहवालानंतर ही गुंतवणूक पुन्हा चर्चेत आली आहे. हिंडनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समुहाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
LIC Shares All Time Low: हिंडनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) या अमेरिकेतील संस्थेने भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानींच्या मालकीच्या अदानी उद्योग समुहाविरोधात आपला अहवाल जारी केल्यापासून सातत्याने अदानी समुहाच्या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. मागील महिन्यापासून अदानींच्या कंपनीचे शेअर्स सातत्याने पडत असतानाच आता या कंपनीची हिस्सेदारी असलेल्या इतर कंपन्यांनाही या अहवालाचा फटका बसत आहे. अदानी समुहाची गुंतवणूक असलेल्या एलआयसी (LIC) कंपनीशी संबंधित कंपन्यांवरही याचा परिणाम होत आहे.
एलआयसीचे शेअर्स गडगडले
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या म्हणजेच एलआयसीच्या शेअर्सनं नवी निच्चांकी पातळी गाठली आहे. सोमवारी एलआयसीच्या शेअर्सने हा नकोसा पराक्रम केला. अदानी समुहाचे शेअर्स गडगडल्याने त्याचा फटका एलआयसीच्या शेअर्सलाही बसला. सोमवारी एनएलसीवरील व्यवहार बंद झाले त्यावेळी एलआयसीचे शेअर्स 567.75 पर्यंत पडले. याच दिवशी एलआयसीच्या शेअर्सनं 566 ची निच्चांकी पातळी गाठली होती.
अव्वल 10 कंपन्यांमधून बाहेर
एलआयसीचे मुल्य सोमवारी 2.4 ट्रिलियन्सने कमी झाले. एलआयसी एकूण कंपनीच्या मूल्यानुसार अव्वल 10 कंपन्यांच्या यादीमधून (10 Most Valuable Companies In India) बाहेर पडली आहे. कंपनी शेअर मार्केमध्ये लिस्ट झाली तेव्हा ती 6 व्या स्थानी होती. सोमवारी कंपनीची घसरण 12 व्या स्थानापर्यंत झाल्याचं वृत्त बिझनेस स्टॅण्डर्डने दिलं आहे. मागील महिन्यामध्ये जेव्हा हिंडनबर्गचा अहवाल समोर आला त्यानंतरही एलआयसीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची पडझड झाली होती. 24 जानेवारी रोजी हिंडनबर्गने अदानी समुहाने आर्थिक व्यवहारांमध्ये अफरातफर केल्याचा दावा करणारा अहवाल जारी केल्याने जगभरात खळबळ उडाली होती. यानंतर अदानी समुहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
अदानींच्या शेअर्सचे भाव मंगळवारी वधारले
दरम्यान, मंगळवारी अदानी समुहाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. अदानी समुहाच्या अदानी इंटरप्रायझेसचे शेअर्स 13 टक्क्यांनी वधारले. अदानी विल्मर आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले होते. अदानी पोर्टचे शेअर्सही मंगळवारी 5 टक्क्या चढ्या भावाने ट्रेण्ड होत होते. मात्र अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅसचे शअर्स 5 टक्क्यांनी गडगडल्याचं मंगळवारी दिसून आलं.
एलआयसीमध्ये अदानींचा किती पैसा?
एलआयसीच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये अदानींची गुंतवणूक ही 1 टक्क्यांहूनही कमी आहे. तरीही हिंडनबर्ग रिपोर्टनंतर ही गुंतवणूक चर्चेत आली आहे. 31 जानेवपर्यंतच्या आकडेवारीनुसार एलआयसीमधील इक्विटी आणि डेबिट होल्टींगर्सपैकी एका टक्क्याहून थोडा कमी भाग हा अदानी समुहाकडे आहे. अदानींकडे असलेल्या एलआयसीच्या शेअर्सची किंमत 36 हजार कोटी इतकी आहे. अदानींकडील एलआयसीच्या मालकीची इक्विटी व्हॅल्यू 30,127 कोटी इतकी आहे. अदानी समुहाला हिंडनबर्ग रिपोर्टमुळे फटका बसल्यानंतर ज्या भावात एलआयसीचे शेअर्स कंपनीने घेतलेले त्याहूनही कमी किंमतीपर्यंत ते घसरले होते.
एलआयसीबद्दल नकारात्मक भावना
या क्षेत्रातील जाणकारांनुसार अदानी समुहाची एलआयसीमध्ये असलेली गुंतवणूक आणि त्यानंतर हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानी समुहाला बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये या समुहामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. तसेच सरकारी निर्गुंतवणुकीकरणाबद्दल बोललं जातं तेव्हा सर्वात आधी एलआयसीचं नाव घेतलं जात असल्याने कंपनीबद्दल नकारात्मक चर्चा बाजारात अधिक असल्याचाही फटका बसतोय असं सांगितलं जात आहे.