Aditi Anand as L'oreal GM and Marketing Head: सध्या स्त्रिया या सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत. आता अशीच एक अभिमानास्पद बातमी समोर येते आहे. कोका-कोलाच्या क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजीच्या (coco cola creative strategies) माजी प्रमुख अदिती आनंद (aditi anand) यांची लॉरिल प्रोफेशनल (L’Oreal Professional) च्या जनरल मॅनेजर आणि मार्केटिंग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ही बातमी सगळीकडेच जोरानं व्हायरल होते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिती यांनी यापूर्वी भारत आणि दक्षिण पश्चिम आशियातील कोका-कोला येथे क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजीचे प्रमुख म्हणून एक वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. त्यांनी भारत आणि दक्षिण-पश्चिम आशियामध्ये कोकसाठी क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजीचे नेतृत्व केले आणि ब्रँड आणि व्यवसाय धोरणाचे कन्झ्युमर स्ट्रॅटेजीमध्ये (brand and business consumer strategies) रूपांतरित करण्यासाठी आणि विविधढंगी कल्पनांद्वारे लोकांशी संवाद साधण्याची त्यांनी प्रमुख जबाबदारी होती. याबाबत त्यांनी लिंकडेन (linkedIn) वर एक पोस्ट टाकून माहिती दिली आहे. 


हेही वाचा - गुगल सीईओ Sundar Pichai यांना पद्मभुषण पुरस्कार देऊन सन्मान


काय आहे अदिती यांचा आत्तापर्यंतचा बायोडेटा?


कोका-कोलामध्ये सामील होण्यापूर्वी अदितीने एचएमडी ग्लोबलमध्ये ब्रँड (HMD Global Brand) मध्ये, मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग हेड म्हणून 4 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. HMD मध्ये त्यांनी भारतातील नोकिया मोबाईलसाठी (nokia) ब्रँड आणि मीडिया स्ट्रॅटेजीचं नेतृत्व केलं. यापूर्वी अदितीने मायक्रोमॅक्समध्ये (micromax) मार्केटिंग प्रमुख म्हणून सुमारे 2 वर्षे, फ्लिपकार्टमध्ये (fllpkart) जवळपास 2 वर्षे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक म्हणून आणि भारती एअरटेलमध्ये (bharti airtel) सुमारे 7 वर्षे काम केले आहे.