मुंबई : मुळचा पाकिस्तानी गायक असलेल्या अदनान सामीच्या पद्म पुरस्काराचा वाद टोकाला गेला आहे. काँग्रेसच्या टीकेला अदनान सामीनं जोरदार उत्तर दिलं आहे. वडिलांच्या चुकीची शिक्षा मुलाला का? कोणत्याही कायद्यात असं लिहिलेलं नसल्याचं सांगत अदनानं ट्विटरवरून काँग्रेसवर पलटवार केला आहे. तर भारतात जन्मलेले मुस्लीम कमी कर्तृत्ववान होते का की पाकिस्तानातल्या अदनान सामीला पुरस्कार दिला असा सवाल अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेनंही अदनानला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराचा जोरदार निषेध केला आहे. हा पुरस्कार रद्द करण्याची मागणी मनसेने केली आहे. 



काही वर्षांपूर्वीच भारताचं नागरिकत्व मिळवणाऱ्या अदनानला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सामी हा याआधी पाकिस्तानी नागरिक होता. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मात्र सामीला पद्मश्री जाहीर झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या सर्वांचं अभिनंदन. मला आनंद आहे की, गायक आणि संगीतकार अदनान सामीला ही पद्मश्री दिला गेला.'


'मी सामीला भारतीय नागरिकत्व देण्यासाठी भारत सरकारकडे सिफारिश देखील केली होती. मोदी सरकारने त्याला भारतीय नागरिकत्व दिलं. भारत सरकारला भारतीय नागरिकत्व हवं असलेल्या कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला नागरिकत्व देण्याचा अधिकार आहे. तर मग सीएबी आणि सीएए का ? भारतीय राजकारण फक्त ध्रुवीकरणासाठी. जर पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांग्लादेशमध्ये अन्याय झालेल्या उच्च प्रतिष्ठेच्या व्यक्तीला जर भारतीय नागरिकत्व हवं असेल तर मग भारत सरकार काय करणार?'