मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. बांधकाम सुरू असलेलं घर तुम्ही बुक केलंत तर त्यावर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्केच जीएसटी लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात मंत्रीगटाची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घरांवर ५ टक्के जीएसटी लावण्याची शिफारस मंत्रीगटानं जीएसटी काऊन्सिलला केलीय. पुढच्या काही दिवसांत जीएसटी काऊन्सिलची बैठक होणार आहे. त्यामध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदारांना दिलासा देता येईल का? यावर चर्चा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मंत्रीगटाच्या बैठकीतून ही शिफारस करण्यात आलीय. या मंत्रिगटाचे सदस्य असलेल्या गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी ही माहिती दिलीय.


कालच रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या पतधोरणानंतर गृहकर्जही स्वस्त झालंय. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर हा डबल धमाका जाहीर केलाय.