नवी दिल्ली : एका महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूच्या 3 वर्षानंतर त्याच्या मुलाला जन्म दिला आहे. ही कथा नाही तर सत्य आहे. ही संपूर्ण घटना बंगळुरु येथील आहे. मुलाला जन्म देणाऱ्या महिलेचं नाव सुप्रिया जैन असं आहे. सुप्रिया जैन आणि गौरव यांचा विवाह झाल्यानंतर 5 वर्षापर्यंत त्यांना अपत्य झालं नव्हतं. त्य़ानंतर या दाम्पत्याने IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान 2015 मध्ये गौरव यांचा एका अपघातात मृत्यू झाला.


मुलाला जन्म देण्याचा निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेच्या जवळपास 2 वर्षानंतर सुप्रियाने पतीच्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया जैनने जसलोक हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. मुळची जयपूर येथील राहणारी सुप्रियाला आत्मविश्वास होता. तिने तिच्या आई-वडिलांशी चर्चा केली. त्यानंतर सुप्रियाने हा निर्णय घेतला. ती म्हणते की, 'आम्ही मुलासाठी एक सुरुवात केली होती आणि आम्ही पुढचं पाऊल उचलू शकत होतो.' सुप्रियाने डॉ. फिरूजा पारिख यांच्यासोबत चर्चा केली आणि यानंतर आई बनण्याचा निर्णय घेतला.


डॉक्टरांच्या मते हे अवघड होतं


डॉक्टरांच्या मते, हे सगळं सोपं नव्हतं. खूप कठीणपणे  सुप्रियाच्या पतीचे स्पर्म्स सांभाळून ठेवण्यात आले होते. डॉ. पारिख म्हणतात की, 'आम्हाला कोणताही धोका घ्यायचा नव्हता. आम्ही अनेकदा एग्स फर्टिलाईज करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही सरोगेट शोधण्याचा प्रयत्न सुरु केला. जेव्हा आमच्याकडे शेवटचा पर्याय होता तेव्हा आम्हाला आशा नव्हत्या पण ते यशस्वी ठरलं.'


स्वप्न पूर्ण झालं


सुप्रिया बालीमध्ये होती जेव्हा तिने सरोगेट मदरच्या माध्यमातून तिला मुलगा झाल्याचं कळलं. ती म्हणते की, 'मला आशा आहे की तो त्याच्या वडिलांप्रमाणेच दिसत असेल.' सुप्रिया पुढे म्हणते की, 'मला मुलगा नाही गौरवचा मुलगा हवा होता. आम्ही आधीच ठरवलं होतं की आमचा एक मुलगा असेल आणि दुसरा आम्ही दत्तक घेऊ.'