Baba Vanga Predictions: बल्गेरियातील बाबा वेंगा  (Baba Vanga) ही तिच्या नवनवीन भविष्यवाणीमुळे नेहमीच चर्चेत असते. 'बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस' अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांची दृष्टी गेली. पण त्यांनी त्यांच्या भविष्यवाणीमुळे जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या भविष्यवाणी  नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा वेंगाच्या भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी लोक कायम उत्सुक असतात. 2022 या वर्षासाठी  बाबा वेंगा यांनी 6 भविष्यवाणी केल्या होत्या. त्यातल्या आतापर्यंत 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. असा अंदाज लावला जात आहे की उरलेल्या 4 भविष्यवाणी येत्या काही महिन्यांमध्ये खऱ्या ठरतील. तर जाणून घेऊया त्यांनी केलेल्या भविष्यवाणी...(After Baba Venga 2 Predictions came true now the worlds attention nz)


आणखी वाचा - कोल्ड्रिंकचा अख्खा कॅन 'या' व्यक्तीने तोडांत घातला आणि घडवला World Record...



बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलणार? याचे गंभीर परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील असं त्यांनी त्यांच्या भविष्यवाणीत सांगितले होते. तर 2028 मध्ये अंतराळवीरांना शुक्र ग्रहावर पोहचण्यात यश मिळेल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2046 मध्ये अवयव प्रत्यरोपणाच्या मदतीने लाखों लोकांचे जीव वाचू शकतात. 



बाबा वेंगा यांनी 6 भविष्यवाणी केल्या होत्या. त्यातल्या आतापर्यंत 2 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. त्यापैकी एक होती आशियाई देशातील लोकांना उपासमारीच्या समस्येला सामोरे जावे लागेल व पूर येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली होती. ऑस्ट्रेलियात पूरसदृश स्थिती निर्माण झाली तसेच पाकिस्थानातही अतिवृष्टीमुळे 1000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या. 


आणखी वाचा - Bathroom मध्ये तुम्हाला ही Creative Ideas सूचतात का? पाहा यावर शास्त्रज्ञ काय सांगतात



बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार कोरोना नंतर लवकरच दुसरा प्राणघातक विषाणू येईल असं देखील सांगितले आहे. तर 2022 मध्ये तापमानात घट होईल आणि लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागेल. दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होईल हे देखील त्यांनी त्यांच्या भविष्यवाणीत सांगितले होते. 


आणखी वाचा - करवा चौथनंतर विकी कौशलचे तालरंग बदलले? कतरिनाला जे म्हणाला ते ऐकून तुम्हालाही घाम फुटेल



बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आता लोकांचे लक्ष 2023 कडे आहे. कारण बाबा वेंगा यांनी 2023 साठी देखील काही महत्त्वाच्या भविष्यवाणी केल्या आहेत.