अंदमानमध्ये सापडला `कोरोनाचा बाप`; जगभरातील औषधं त्यासमोर फेल
कोरोनानंतर आता `कँडिडा ऑरीस सुपरबग `ची धास्ती...
Corona virus : जगात कोरोनाची साथ पसरल्यानंतर अशा आणखी कोणत्या विषाणू किंवा जिवाणूंचा धोका असू शकतो, या दिशेनं शोध घ्यायला सुरूवात झाली आहे. त्यावेळी भारतीय संशोधकांच्या एका गटाला कोरोनाचा बाप सापडलाय. नक्की काय हाती आलंय संशोधकांच्या हाती पाहूयात
कोरोनाचा कहर सुरू असताना आता एक सुपरबगनं जगाची धडधड वाढवली आहे.
अंदमान बेटांवर आढळून आलेला 'कँडिडा ऑरीस' किंवा सी ऑरीस हा सुपरबग कोणत्याच पारंपारिक अँटीफंगल औषधाला जुमानत नाही. दिल्ली विद्यापीठातील डॉ. अनुराधा चौधरी यांच्या टीमनं अंदमान बेटं आणि भारत-म्यानमार दरम्यान असलेल्या बेटांवरील वेगवेगळ्या ठिकाणची माती आणि पाण्याचे नमूने गोळा केले आहेत.
का धोकादायक आहे हा व्हायरस ?
सी ऑरीस हा सुपरबग सुरूवातीला माणसाच्या त्वचेवर आघात करतो.
त्वचेच्या आधारे तो जीवंत राहतो आणि तेव्हा कोणतेही सिम्टम्स दिसत नाहीत.
मात्र एखाद्या जखमेवाटे तो रक्तात गेला, की खेळ खल्लास..
रुग्णाला ताप येतो, थंडी वाजू लागते... हे याचं प्राथमिक लक्षण.
याची अखेर होते ती सेप्सिस हा दुर्धर आजार होण्यात...
सेप्सिसमुळे जगभरात वर्षाला 1 कोटी 10 लाख लोक दगावतात.
या सेप्सिसला कारणीभूत ठरू शकणाऱ्या सुपरबगवर औषध नसल्यामुळे मृत्यू अटळ आहे...
जगातल्या अनेक देशांमध्ये कोविड 19च्या एकामागून एक लाटा येतायत. त्यात आता सी ऑरीस या सुपरबगनं जगाची डोकेदुखी वाढवलीये.