Cyrus Mistry Car Accident: टाटाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधनानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. 54 वर्षीय उद्योगपतींनं अचानक जगाचा निरोप घेतल्याने दु:ख व्यक्त केलं जात आहे.  मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4 मॅटिक कारने ते मुंबईकडे जात असताना त्यांची कार दुभाजकावर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारमध्ये एकूण चार जण होते आणि त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सुरक्षित गाड्या असूनही अपघात होत असल्याने लक्झरी गाड्यांप्रती लोकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. कारमध्ये मागे बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी बेल्ट (Seat Bealt Alert) न लावल्याने अपघाताचे बळी ठरले, असे सांगितले जात आहे. तेव्हापासून सीट बेल्टच्या महत्त्वावर बरीच चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, सरकारने शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनसाठी (Amazon Product) आदेश जारी केला असून काही उत्पादनाच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी यांनी Amazon ला त्यांच्या साइटवर सीटबेल्ट अलार्म ब्लॉकर्सची विक्री थांबवण्यास सांगितलं आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी सांगितलं की, बरेच लोक अॅमेझॉनवरून क्लिप खरेदी करतात ज्याचा वापर सीट बेल्ट अलार्म ब्लॉक करण्यासाठी केला जातो. या उत्पादनाची विक्री थांबवण्यासाठी अॅमेझॉनला नोटीस पाठवण्यात आली आहे.


जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने अपघातग्रस्त कारची डेटा चिप घेतली आहे. तसेच ती चिप जर्मनीला पाठवण्यात आली आहे. या चिपचा अभ्यास केला जाणार आहे. यामुळे अपघाताच्या परिस्थितीचे स्पष्ट चित्र समोर येण्यास मदत होईल. अपघात कशामुळे झाला? अपघाताच्या वेळी कारचा वेग काय होता? कोणत्या एअरबॅग्ज कार्यरत होत्या? कारचे ब्रेक कार्यरत होते का? आणि इतर गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे.


एनसीआरबी 2021 च्या अहवालानुसार, भारतात रस्ते अपघातांमुळे 1,55,622 मृत्यू झाले आहेत आणि त्यापैकी 69,240 अपघात दुचाकी वाहनांचे झाले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारतात दर चार मिनिटांनी एक मृत्यू आहे.