1000 Rupees Notes: नुकतीच 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरबीआयकडून पुन्हा एकदा एक लक्षवेधी घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी आरबीआयच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून देशातील चलनामध्ये असणारी सर्वात मोठी नोट बाद का करण्यात आली, यामागचं कारणंही स्पष्ट करण्यात आलं. शिवाय येत्या काळात देशातील चलनात 1 हजार रुपयांची नोट परतेल का? या प्रश्नाचं उत्तरंही दिलं. 


काय म्हणाले गव्हर्नर? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्यातरी 1000 रुपयांची नोट चलनात परत आणण्याचा कोणताही बेत नसल्याचं दास यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं आता सक्रीय चलनामध्ये या दोन मोठ्या नोटा तूर्तास दिसणार नाहीत असंच म्हटलं जात आहे. दरम्यान, 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. देशातील काळ्या धनावर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कारण तेव्हा पुढे करण्यात आलं होतं. 


सध्याच्या घडीला देशातील वापरात असणाऱ्या चलनातून 2000 रुपयांची नोट बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरीही त्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी दिला गेला आहे. शिवाय देशातील चलन व्यवस्थापन अतिशय चोखपणे काम बजावत असल्याची बाब आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मांडली. त्यामुळं अनेकांनीच आपल्याकडे असणाऱ्या 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी विविध बँकांकडे धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे.


हेसुद्धा पाहा : एकदा चार्ज करून 370 किमीचा प्रवास करणारी इलेक्ट्रिक मिनीवॅन पाहिली का? SUV लाही देतेय टक्कर 


दरम्यान, 500 रुपयांच्या नोटीबाबच नागरिकांच्या मागणीवरूनच पुढील निर्णय घेण्यात येईल असंही ते म्हणाले. त्यामुळं आता येत्या काळात पुन्हा एकदा देशभरात आरबीआयच्या नव्या धोरणांकडे सर्वांचच लक्ष राहणार आहे. 


...तर कारवाई होणार 


23 मे म्हणजेच मंगळवारपासून देशात 2000 रुपयांच्या नोटा परत घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यादरम्यानच्या काळात नोटा परत घेणाऱ्या बँकांमध्ये त्यांची पडताळणीही पार पडणार आहे.  थोडक्यात जर एखादी व्यक्ती नोट जमा करण्यासाठी बँकेत जातो आणि त्यांच्या नोटा बनावट असल्याची बाब समोर येते तर, अशा परिस्थितीमध्ये बँक त्या नोटा जप्त करून त्यापुढील कारवाई करेल. शिवाय या बनावट नोटांवर आरबीआयकडून एक शिक्काही मारण्यात येईल ज्यानंतर त्यांना शून्याचीही किंमत राहणार नाही.