इंफाळ :  देशभरात Coronavirus कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही आरोग्य विभागापुढे अनेक आव्हानं उभी करत असतानाच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गोव्यामागोमाग आता कोरोना विषाणूच्या कहरातून पूर्णपणे बाहेर येत आणखी एका राज्याने या संकटावर मात केली आहे. या राज्यातील एकमात्र कोरोना बाधितानेही या विषाणूचा पराभव केला आहे. हे राज्य म्हणजे मिझोरम. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारीच येथील कोरोना रुग्णाला सर्व उपचार आणि चाचण्यांनंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. ज्या आधारे आता पूर्वोत्तर भागातील ग्रीन झोन असणाऱ्या चार राज्यांमध्ये मिझोरमचाही समावेश झाला आहे. आतापर्यंत या यादीत नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश होता. आता फक्त आसाम आणि त्रिपूरा येथेच कोरोना रुग्ण आढळले असल्याची बाब समोर येत आहे. 


मिझोरमचे आरोग्यमंत्री ललथंगलिआना यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या सर्व चाचण्या निगेटीव्ह आल्यामुळे शनिवारी या व्यक्तीला रुग्णालयातून रजा देण्यात आली. जवळपास ४५ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हा ५० वर्षीय रुग्ण मिझोरममधील एकमेव कोरोनाबाधित होता. 


 


वाचा : 'भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल'


१६ मार्चला एम्सटरडॅममधून परतणाऱ्या या व्यक्तीला २४ मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, या एका रुग्णानेही कोरोनावर मात केल्यामुळं आता मिझोरम कोरोनामुक्त घोषित करण्यात आलं आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्वच कर्मचाऱी, परिचारिका आणि डॉक्टरांचे आभार मानत त्यांना याचं श्रेय दिलं,