मुंबई : पंजाबमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या पक्षात पुन्हा एकदा एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधेयकांच्या बैठकीत समील झालेले पंजाबचे प्रधान नवज्योत सिंग सिद्धू चंदीगढच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. दरम्यान सूत्रांनुसार, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पंजाबमध्ये काँग्रेस पक्षातील कलह गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. हे मिटवण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांना दिल्लीमध्ये देखील बोलावण्यात आलं होतं. यानंतर आज होणाऱ्या 5 वाजताच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. 


या बैठकीमध्ये सर्वांची नजर अमरिंदर सिंग यांच्यावर असणार आहे. गेल्या काही महिन्यांत नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या आमदारांचा एक गट तयार झाला आहे. यावेळी अमरिंदर सिंग त्यांनी यांच्याविरोधात बंड पुकारले असून नव्या नेत्याची मागणी केली आहे. 


कॅप्टन अमरिंदर आपल्या काही जवळच्या सहकार्यांसह आपल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यानंतर काही वेळातच बैठकीपूर्वी नाराज कॅप्टन अमरिंदर सिंह यांची भेट घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री ब्रह्ममोहिन्दरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.


पंजाबमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी पक्षाच्या राज्य युनिटमध्ये अडकलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्वीकारलेल्या पद्धतीने केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनाच नाही, तर अकाली दलाचा पायाही हादरवून टाकला आहे.