Office Working Tips: ऑफिसमध्ये काळजीपूर्वक काम करणं गरजेचं असतं. कारण एखादी चूक महागात पडू शकते. यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावं लागतं. पण कधी कधी काम करताना खूपच आळस भरतो आणि याचा परिणाम आपल्या कामावर होतो. यासाठी ऑफिसला जाण्यापासून काम करेपर्यंत प्रत्येक गोष्टींचं नियोजन करणं आवश्यक आहे. अनेकदा ऑफिसला गेल्यावर काही वेळेनं झोप येऊ लागते. एका अहवालानुसार ऑफिसला जाणाऱ्या पाच पैकी दोन जण झोपेच्या समस्या जाणवते. त्यामुळे आपलं काम व्यवस्थित होत नाही आणि पूर्ण दिवस तणावात जातो. झोप पूर्ण न झाल्याने ही समस्या जाणवते. अनेकदा दुपारचं जेवण जास्त झाल्याने झोप येते. त्यामुळे बॉसकडून ओरडा खावा लागतो. त्यामुळे आपल्या कामाचं, जेवणाचं आणि झोपेचं नियोजन करणं आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाणी ऐका: तुम्हालाही ऑफिसमध्ये झोप येत असेल तर गाणी ऐकणे हा एक चांगला उपाय आहे. जेव्हा तुम्ही झोपेसारखं वाटेल, तेव्हा हेडफोनद्वारे संगीत ऐका. पण संगीत असे असावे की, त्याने आनंद होईल. दुःखी संगीत ऐकल्याने तुमचा मूड देखील खराब होऊ शकतो.


कॉफी प्या: कॉफीमध्ये कॅफिन असतं. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येत असेल तर तुम्ही कॉफी पिऊ शकता. यामुळे झोप येत नाही. चहा हा देखील चांगला पर्याय असू शकतो. पण, चहामुळे गॅस होऊ शकतो.


व्यायाम: ऑफिसमध्ये व्यायाम करणं शक्य नाही. पण, झोप येत असेल आणि तुम्ही बसून राहिलात तर आणखी त्रास होईल. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला झोप येईल, तेव्हा स्वत:ला सक्रिय ठेवण्यासाठी थोडा ब्रेक घ्या. शरीराला डिहायड्रेट होऊ देऊ नका, पाणी पित राहा. यामुळे सक्रिय राहण्यास मदत होईल.


झोप: जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर संपूर्ण दिवस वाया जातो. दिवसभर थकवा जाणवतो. तर कधी कधी डोकंही दुखतं. यामुळे तुम्हाला दिवसभरात कधीही झोप येऊ शकते. जर तुम्हाला पुरेशी झोप येत नसेल तर चांगली झोप घेण्याची सवय लावा.