मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनानंतर मुलगी जान्हवी कपूरचा धडक रिलीज झालेला धडक सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडलायं. या सिनेमात तिने ईशान खट्टरसोबत काम केलंय. 'धडक' हा केवळ सिनेमा नाही तर जान्हवीचं स्वप्न होतं आणि श्रीदेवी आपल्या मुलीचं हे स्वप्न पूर्ण होताना पाहू इच्छित होती. पण श्रीदेवीच्या मृत्यूनंतर जान्हवीला खूप दु:ख झालं. सिनेमाच्या शूटींगमुळे तिचे लक्ष डायवर्ट तर झाल पण या काळातून बाहेर पडणं तिला आजही कठीण जातय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने सांगितले, 'मला अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही, मी स्वत:ला इतका विचार करण्याचा वेळ दिला नाही. मी आणि माझा परिवार ही गोष्ट स्वीकारु शकलो नाहीए की आई या जगात नाही.'


दुसऱ्या दिवशीच शुटींगला जायच होतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'मी तर दुसऱ्या दिवशीच (अंतिम संस्कारच्या) शूट वर जाऊ इच्छित होती पण शूट कॅन्सल झालं.' कामावर गेली नसती तर मानसिक संतुलन संपल असतं असं तिने भावुक होऊन सांगितले. 'धडक' नसती तर मला आयुष्यात पुढे जाण्याचे उद्देश्य नसते असेही तिने सांगितले. 


खुशीलाही बनायचयं अभिनेत्री


बोनी आणि श्रीदेवी यांची छोटी मुलगीदेखील अॅक्टींग करू इच्छिते. याचा खुलासा खुद्द बोनी कपूर यांनी केलायं. 'मी असं नाही म्हणणार की मी जान्हवीला मोटीवेटेड केलंय पण हा मी तिला उत्तेजन नक्की दिलं की तिला जे करायचयं ते कराव.' अस ते म्हणाले. 'अर्जुनमध्ये अभिनेता बनण्याचे गुणं आहेत हे सलमानने मला सांगितल्यावर कळाले. दुसरीकडे मोठी मुलगी अंशुलाचा शिक्षणाकडे जास्त कल आहे आणि खुशीलाही आधी मॉडेल बनायच होतं पण आता तिच लक्षही अभिनेत्री बनण्याकडे असल्याचेही' ते म्हणाले.