MDH Masala Ban: भारतीयांच्या जेवणात स्वादाचा तडका देणाऱ्या दोन भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांवर हाँगकाँग व सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. भारतीय कंपनी MDH प्रायव्हेट लिमिटेड आणि Everest फूड प्रोडक्ट लिमिटेडच्या करी मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारदेखील अॅक्शन मोडवर आली आहे. या दोन्ही ब्रँडच्या सॅम्पलची टेस्टिंग करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राने फूड कमिश्नरना या दोन्ही ब्रँडच्या मसाल्यांचे सँम्पल गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. हाँगकाँगने या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनात कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड एथिलीन ऑक्साइडचे प्रमाण जास्त असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळं कर्करोगाचा धोका वाढतो, असंही अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर सिंगापूरनेही या दोन्ही ब्रँडच्या मसाल्यांवर बंदी घातली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील सर्व फूड कमिश्नरना अलर्ट केले आहे. मसाल्यांच्या सॅम्पल गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फक्त एमडीएच आणि एव्हरेस्ट नाही तर मसाला बनवण्याच्या सर्व कंपन्यांच्या प्रोडक्शन युनिटमधून सॅम्पल घेण्यात येणार आहे. या सॅम्पलचे 20 दिवसांत लॅबमधून अहवाल येणार आहेत.


दरम्यान, दोन देशांनी या कंपन्यांबाबत घेतलेल्या निर्णयानंतर स्पाइस बोर्डाकडे अपील करण्यात आली आहे की, मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे हानिकारक तत्वे मिसळू नयेत. जर भारतातील मसाल्यांमध्ये हानिकारक तत्वे आढळले तर कठोर पावलं उचलण्यात येतील. संबंधित कंपन्यांविरोधात कारवाईदेखील करण्यात येऊ शकते. भारतात खाण्या-पिण्याच्या वस्तुंमध्ये एथिलिन ऑक्साइडच्या वापरावर बॅन लावण्यात आला आहे. 


हाँगकाँगने का केलं बॅन?


हाँगकाँगच्या फूड सेफ्टी डिपार्टमेंटने एक स्टेटमेंट जारी करत म्हटलं आहे की, MDH ग्रुपच्या तीन मसाला मिक्स मद्रास करी पावडर, सांभर मसाला पावडर आणि करी पावडरमध्ये कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड एथिलीन ऑक्साइडची मात्रा जास्त आढळली गेली आहे. रुटीन सर्विलान्स प्रोग्रामअंतर्गंत एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यातही हे पेस्टिसाइड आढळले गेले आहे. 


सिंगापूरमध्येही बंदी घालण्यात आली?


सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी एव्हरेस्टच्या फिश तरी मसाला बाजारातून हटवण्याचे आदेश दिले आहे. प्रमाणापेक्षा जास्त एथिलीन ऑक्साइडची मात्रा आढळल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. अॅथिलीन ऑक्साइड एक किटकनाशक आहे. सिंगापूरसह 80 देशांमध्ये एव्हरेस्टच्या प्रोडक्टचा पुरवठा केला जातो.