Kulhad Pizza Couple Leaked Video: पंजाबमधील जालंधरच्या प्रसिद्ध 'कुल्हड पिझ्झा' (Kulhad Pizza) कपलचा कथित एमएमएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हे कपल तुफान प्रसिद्ध आहे. मात्र आता एमएमएस व्हायरल (Private MMS Leak) झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे जोडपे सध्या त्यांच्या कथित खासगी व्हिडिओवरून वादात सापडले आहेत. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर कुल्हड पिझ्झाच्या मालकाने व्हिडिओ शेअर करत एका महिलेवर ब्लॅकमेलिंगचा (Blackmaling) आरोप केला आहे. हा व्हायरल व्हिडिओ खोटा  असून, लोकांनी हा व्हिडिओ शेअर करणे बंद करण्याचे आवाहन या जोडप्याने केले होते. त्यानंतर आता राजकीय दबावाचा देखील सामना करावा लागत असल्याचे या जोडप्याने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुल्हड पिझ्झाचा मालक सेहज अरोरा आणखी एक सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. पत्नीने नुकताच बाळाला जन्म दिला असून ती नैराश्यात गेली आहे. त्यामुळे फॉलोअर्सने आमच्यासाठी प्रार्थना करावी असे सेहज अरोराने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे. "माध्यमांना आणि जनतेला आवाहन.. मुलाखत देण्याचे आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवण्याचे धाडस माझ्यात नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय खोटी विधाने करून आमची प्रतिमा खराब करू नका," असे सेहज अरोराने फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.


"राजकीय दबावामुळे आम्हाला यावर तोडगा काढण्यास भाग पाडले जात आहे. आम्ही हे नाकारल्यावर आमच्या विरोधात विधाने करण्यात आली. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्हाला कोणतेही राजकीय समर्थन नाही. इंटरनेटवरील हे व्हिडिओ थांबवण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे," असे सेहज अरोरानं म्हटलं आहे. 


 



या जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सेहज अरोराने पोलिसांत याप्रकरणाची तक्रार दिली होती. तक्रारीनुासर एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मात्र पोलिसांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय, कुल्लड पिझ्झाच्या मालकाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक आवाहन करणारा व्हिडिओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये तो रडताना दिसत होता आणि लोकांना हा कथित एमएमएस फॉरवर्ड न करण्याचे आवाहन करताना दिसत आहे.