Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. भारतीय नौदलाअंतर्गत अग्निवीरची एकूण 4465 पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण रिक्त पदांपैकी, ०२/२०२३ (नोव्हेंबर २३) आणि ०१/२०२४ (२४ एप्रिल) बॅचसाठी अग्निवीर (एसएसआर) साठी ४४६५ रिक्त जागा आणि ०२/२०२३ (२३ नोव्हेंबर) आणि ०१/२० (४२/२०) बॅचसाठी उर्वरित ३०० रिक्त जागा बॅचसाठी अग्निवीर (एमआर) साठी वाटप करण्यात आले आहे. 


अग्निवीरच्या रिक्त पदांसाठी अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवार अर्ज करु शकतात. यासंदर्भात भारत सरकारने विहित केलेल्या पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. 


Indian Navy SSR MR Recruitment 2023:   अर्ज प्रक्रिया 


अग्निवीर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.


आता तुमच्या समोर होमपेज खुले होईल. येथे समोर दिसणाऱ्या  'Apply Online' च्या लिंकवर क्लिक करा.


आता तुम्ही तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा. 


तुम्ही जर पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर तुम्हाला  'न्यू यूझर्स'वर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी लागेल.


लॉगिन केल्यानंतर, SSR किंवा MR साठी इंडियन नेव्ही अग्निवीर भर्ती 2023 वर क्लिक करा.


तुमच्या स्क्रीनवरर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला विचारलेले सर्व तपशील भरा.


सर्व तपशील भरल्यानंतर, तुमचा फॉर्म सबमिट करा आणि तुमच्या फॉर्मची प्रिंट आउट घ्या.


संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा, लेखी परीक्षा, पीएफटी आणि वैद्यकीय परीक्षांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार भारतीय नौदल SSR MR अर्जाची लिंक खाली तपासू शकतात.


या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 19 जून 2023 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. नोंदणीकृत उमेदवारांसाठी पेमेंट पर्याय 20 जून 2023 रोजी बंद होईल. अर्जाची विंडो 21 जून 2023 रोजी बंद होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.