नवी दिल्ली : डिफेन्स एक्स्पोमध्ये देशाचे पहिले सैन्यदल प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ - सीडीएस) जनरल बिपिन रावत हेदेखील सहभागी होणार आहे. ५ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थात उद्या सैन्यदल प्रमुख पहिल्यांदाच उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये दाखल होतील. यावेळी त्यांच्यासोबत सेनेचे तीनही प्रमुखदेखील उपस्थित असतील. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी याठिकाणी हायअलर्ट जारी करण्यात आलाय. सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर क्यूआरटी तैनात करण्यात आलीय. गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळमार्गे ११ दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश घेतला असून डिफेन्स एक्स्पोमध्ये घातपात घडवून आणण्याचा त्यांचा कट असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळेच भारत आणि नेपाळच्या सीमारेषेवरही हायअलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय, पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्स (RAF) टीम यांचंही घटनास्थळी लक्ष राहील. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या देशांचे ३५ संरक्षण मंत्री, ५४ देशांचे सैन्य प्रमुख तसंच अनेक संरक्षण साहित्य बनवणाऱ्या अनेक कंपन्यांचे व्यावसायिक सहभागी होणार आहेत. भारतातलं हे आजपर्यंत सर्वात मोठं डिफेन्स एक्स्पो असेल असं सांगण्यात येतंय. ‘इंडियाः इमर्जिंग डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ अशी या डिेफेन्स एक्स्पोची थीम असेल.


यावेळी सीडीएस जनरल बिपिन रावत आपल्या गोरखा रायफल्स रेजिमेंटल सेंटरलाही भेट देतील. त्यांच्यासोबत सेनाध्यक्ष जनरल मुकुंद नरवणे हेदेखील आपल्या पहिल्या लखनऊ दौऱ्यावर दाखल होतील. त्यांच्यासोबत नौसेना प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया हेदेखील डिफेन्स एक्सपोमध्ये सहभागी होतील. 



'मेक इन इंडिया' अंतर्गत भारतीय सेनेत सामील होणाऱ्या अनेक तोफा आणि मारक हत्यारांचं निरीक्षण जनरल मुकुंद नरवणे करतील. तर एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया लखनऊच्या आकाशात पहिल्यांदाच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फ्लाय पास्टमध्ये सहभागी होतील. दुसरीकडे, नेव्हल चीफ ऍडमिरल करमबीर सिंह नौसेनेच्या शिपयार्डमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानानं तयार करण्यात आलेल्या युद्धपोत आणि सबमरीन प्रोजेक्टवर अनेक देशांतून आपलेल्या कंपन्यांसोबत भारतीय तंत्रज्ञानासंबंधी कॉन्फरन्स घेतील.


दुपारच्या टॉप हेडलाईन्स


जाणून घ्या काय आहे तानाही कड्याचा इतिहास.....


शिक्षिकेला जाळणाऱ्या आरोपीला अटक, हिंगणघाट बंदची हाक


शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ४०० अंकांनी उसळला


Defence Expo 2020 : गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर हायअलर्ट जारी


यवतमाळ निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी