नवी दिल्ली : आधार कार्डला आपलं मतदान कार्ड लिंक करण्यासंदर्भातील दुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. हे बिल जर संसदेत मंजूर झालं आणि त्याचं कायद्यात रुपांतर करण्यात आलं तर ते नागरिकांसाठी धोक्याचं असेल. असं AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. शिवाय या प्रस्तावाला त्यांनी विरोध दर्शवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधार कार्ड ही देशातील नागरिकाची ओळख आहे. याच आधार कार्डला पॅनकार्डही जोडण्यात आलं आहे. आता त्यापाठोपाठ मतदान पत्र (वोटिंग कार्ड) जोडण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र केंद्राच्या या निर्णयाविरोधात असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध दर्शवला आहे. 


आधारला वोटर आयडी लिंक करणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारचं हे पाऊल नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणणारं आहे. यामुळे नागरिकांची अधिकृत माहिती आणि सुरक्षेला धोका पोहोचू शकतो असंही ते म्हणाले. 


मोदी सरकारनं हा बिल पास करण्यामागे बोगस मतदान कार्ड तयार होणार नाही हा हेतू असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मात्र लोकसभेमध्ये नव्या इलेक्शन लॉ बिलला त्यांनी विरोध केला आहे. याबाबत ओवेसी यांनी आपलं म्हणणंही मांडलं आहे. 


ओवेसींच्या मते यामुळे वंचित आणि भेदभाव करण्याचा अधिकार या सरकारला मिळेल. यामुळे सिक्रेट बॅलेट, फ्री आणि फेयर मतदान होणार नाही. त्यामुळे जर मतदाराला परदर्शकपणे मतदान करायचं असेल तर त्यासाठी अडचणी येतील असंही ओवेसी म्हणाले.