मुंबई : कमी पैशात विमान प्रवास आता शक्य झालेय. तेही देशात आणि परदेशात. मलेशियन बजट एयरलाइन ग्रुप एयर एशियाने ग्राहकांसाठी मर्यादीत काळासाठी सवलतीच्या दरातील मॉन्सून ऑफरची घोषणा केली आहे.  त्यानुसार देशात केवळ १०९९ रुपयांत विमान प्रवास करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एयर एशिया इंडिया एयरलाइनच्या ऑफर मध्ये ग्राहक बंगळूर , नवी दिल्ली, हैदराबाद, कोचीन, गोवा, श्रीनगर, रांची आणि कोलकाता या देशांतर्गत मार्गावर विमान प्रवास करू शकतात. या ऑफरमध्ये ग्राहकांना १५ जानेवारी २०१८ ते २८ ऑगस्ट २०१८ दरम्यान प्रवास करता येतील. आंतराष्ट्रीय विमान प्रवासासाठी कमीत कमी २९९९ रूपये भाडे आकारण्यात येणार आहे.


ग्राहकांना  ४ जून २०१७ ते ११ जून २०१७ प्रर्यंत तिकीट आरक्षण करावे लागणार आहे. या ऑफरच्या माध्यामातून खरेदी केलेली तिकीट नॉन रिफंडेबल असेल. म्हणजे तिकीट रद्द केल्यानंतर तिकीटाचे पैसे परत मिळणार नाहीत.


याआधी गो एयर या कंपनीने प्री मॉन्सून सेलची घोषणा केली.  या योजनेनुसार देशांतर्गत विमान प्रवासासाठी ९९९ रूपये भाडे आकारण्यात येत आहे.