पणजी : भारतीय सैन्य दलासाठी एक चांगली बातमी आहे. कारण, सैन्यदलातील 'विशेष सैनिक दला'च्या जवानांना लवकरच वातानुकूलित जॅकेट्स दिले जाणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले की, सैन्य दलातील विशेष सैनिक दलाच्या जवानांसाठी वातानुकूलित जॅकेट्सची चाचणी केंद्र सरकारतर्फे सुरु आहे. 


विशेष सैनिक दलाच्या जवानांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक अडचणींतही ते मेहनत करतात. वाढत्या तापमानामुळे त्यांच्या शरीराचं तापमान वाढत असतं. अशावेळी जवान अस्वस्थ होतात त्यामुळे जर त्यांच्याजवळ वातानुकूलित जॅकेट्स असतील तर त्यांना काम करणं सोपे जाईल असेही मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे. 


मनोहर पर्रीकर यांनी तेजस विमानांसंदर्भात भाष्य करताना म्हटलं आहे की, एलसीए ही तेजस विमानांची एकमात्र कमकुवत बाजू आहे. तेजस विमानात अवघे ३.५ टन वजन वाहून नेण्याचीच क्षमता आहे.