नवी दिल्ली :  सरकारी एअरलाइन्स कंपनी एअर इंडियाने 'फ्रीडम सेल'ची घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या काही  देशांतर्गत रुट्सवर केवळ ४२५ रुपये तिकिट ऑफर दरात मिळत आहे. ही विमान कंपनी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरही डिस्काऊंट देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ६,०००रुपयांपासून सुरू होणाऱ्या तिकिट दरावर हे डिस्काऊंट मिळणार आहे. फ्रिडम सेल अंतर्गत प्रवासी २० ऑगस्टपर्यंत तिकिट बुकिंग करु शकतात. या काळात तिकिट घेणाऱ्यांनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे. 
 विमान प्रवाशांना डिस्काऊंट ऑफरचा लाभ घेण्यासाठी १६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१७ आणि २५ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत प्रवासाची वेळ निश्चित करावी लागणार आहे. एअर अंडियाच्या 'फ्रिडम सेल' अंतर्गत काठमांडू, ढाका, माले, कोलंबो आणि काबुल अशा दक्षिण आशियाई शहरातील इकॉनामी क्लासच्या तिकिट्सवर ऑफर लागू होणार आहे.


७००० रुपयांपासून सुरू होणाऱ्या तिकिटांवर ही ऑफर असणार आहे.