एअर इंडिया कॅप्टन झोया अगरवालने सोशल मीडियावर उद्योजक रतन टाटा यांची आठवण शेअर केली आहे. रतन टाटा यांचं गुरुवारी वृद्धापकाळाने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त स्वीकारणे अनेकांसाठी कठीण गेले. रतन टाटांसोबत घालवलेले क्षण अनेकांनी शेअर केले आहेत. त्यातीलच हा एक प्रसंग. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रतन टाटा यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी आपल्या भावना सोशलम मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. अशीच एक लक्षवेधी पोस्ट एअर इंडिया कॅप्टन झोया अगरवालची आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, रतन टाटांसोबतची तिची भेट ही 'खोल प्रभाव' करुन गेली आहे. 


कॅप्टन झोया एकदा न्यूयॉर्क ते दिल्ली फ्लाय करत होती. यावेळी रतन टाटा या विमानात होते. प्रवास संपताना रतन टाटा यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा झोया यांनी व्यक्त केली. यावेळी रतन टाटा यांचा दयाळूपणा दिसून आला. जेव्हा झोया आपल्या पायलट सीटवरुन उठून फोटो काढण्यासाठी सरसावली तर तेव्हा रतन टाटा यांनी झोया यांना थांबवून स्वतः तिच्या मागे फोटोसाठी उभे राहिले. रतन टाटा यांचा साधेपणा या कृतीतून अधोरेखित होतो. 



झोया आपल्या पोस्टमध्ये लिहिते की


“मी उड्डाणाच्या शेवटी एक फोटो मागितला आणि मी उठायला गेले तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि म्हणाले, 'कॅप्टन, ही तुझी सीट आहे. तुम्ही ते कमावले आहे.’ ते माझ्या मागे आले आणि आम्ही फोटो काढला.,” कॅप्टन झोयाने X वर लिहिले.


झोयाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन नम्रता आणि कृपेचा अनुभव. या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे झोया म्हणाली की, "हा फोटो माझ्या वैयक्तिक प्रेरणेसाठी होता, परंतु आज मी तो सगळ्यांसोबत शेअर करत आहे. कारण हा वारसा पुढे चालवायचा आहे. रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीसमोर मी कृतज्ञता व्यक्त करते.