नवी दिल्ली : अगोदरच आर्थिक डबघाईत असलेली विमान कंपनी एअर इंडिया ही पुन्हा एकदा नव्याने कर्ज घेण्याच्या विचारात आहे. एअर इंडियाकडून तब्बल ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज घेण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तातडीने भांडवल उभे करण्यासाठी लघु अवधीचे कर्ज म्हणून ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज उचलण्याचा एअर इंडियाचा विचार आहे. प्राप्त माहितीनुसार नव्याने घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी एअर इंडियाला सरकारची मदत होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर, प्रस्तावीत कर्जासाठी केंद्र सरकारची गॅरेंटीही मिळू शकते.


मध्यंतरीच्या काही हालचाली विचारात घेतल्या तर, सरकारी कंपनी असलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन होता. गेले बराच काळ एअर इंडिया आर्थिक तोट्यात असून, सरकारच्या दृष्टीने तो एक पांढरा हत्ती ठरला आहे. त्यामुळे या कंपनीचे खासगीकरण करण्यावर सरकारचा भर आहे. मात्र, त्यावर अद्यापही विचार सुरू आहे.


निर्गुंतवणुकीपुर्वीची तयारी म्हणून एअर इंडियाला लघु ते मध्यम कालावधीचे कर्ज घेणे महत्त्वाचे बनले आहे. यावरूनच लक्षात येते की, एअर इंडियाची आर्थिक अवस्था किती बिकट झाली आहे.