नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचं एएन-32 विमान आसाममधील जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशला निघालं होतं. विमान जोरहाट येथून उडालं पण दुपारी 1 नंतर विमानाचा संपर्क तुटला. हे विमान अजूनही बेपत्ता आहे. वायुसेनेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानात 8 क्रू मेंबर आणि 5 प्रवास आहेत. विमानाचा शोध सुरु आहे. पण अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


2016 मध्ये ही बेपत्ता झालेलं विमान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2016 मध्ये चेन्नई येथून पोर्ट ब्लेयरला जाणारं  AN-32 विमान बेपत्ता झालं होतं. यामध्ये एकूण 12 जवान, 6 क्रू-मेंबर, 1 नौसैनिक, 1 लष्कराचा जवान आणि एकाच परिवारातील 8 सदस्य होते. या विमानाचा शोध घेण्यासाठी 1 पानबुडी, आठ विमानं आणि जहाज लावण्यात आली होती. हे विमान अजूनही सापडलं नाही. या विमानाची काहीच माहिती हाती लागली नाही.


AN-32 विमान


Antonov-32 या मिलिट्री ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टमध्ये 2 इंजिन असतात. हे विमान 55°C पेक्षा अधिकच्या तापमानात ही 'टेक ऑफ' करु शकतो. हे विमान 14, 800 फूट उंचीवर उडू शकतं. विमानात पायलट, को-पायलट, गनर, नेविगेटर आणि इंजीनियरसह 5 क्रू-मेंबर असतात. 50 लोकं यामध्ये बसू शकतात.


AN-32 हे भारतीय वायुसेनेचं मध्यम श्रेणीचं सेवा देणारं विमान आहे. भारतीय वायुसेनेकडे सध्या अशी 100 विमानं आहेत. जे ट्रांसपोर्टचं काम करतात. जगात जवळपास 240 विमान आहेत. भारतीय वायुसेने शिवाय श्रीलंका, अंगोला आणि यूक्रेनच्या वायुसेनेकडे हे विमानं आहेत.