मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी विमानाने प्रवास केला असावा किंवा त्याला टीव्हीवर, फोनवर तरी पाहिले असेलच. मग तुम्ही विमानाच्या खिडक्यांना नीट पाहिलं आहे का? या खिडक्या गोलाकार असतात. मग या खिडक्या गोलाकार का असतात? विमान सोडलं तर दुसऱ्या कोणत्याही वहानाबद्दल बोललो तर त्याच्या खिडक्या या चौकोनी किंवा आयताकृती असतात. मग विमानालाच का गोलाकार खिडक्या असतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर याचा संबंध विमानाच्या सुरक्षेशी आहे, चला तर याचं उत्तर, जाणून घेऊ...


रीडर्स डायजेस्टच्या वृत्तानुसार विमानाच्या खिडक्या नेहमीच गोल नव्हत्या. 1950 च्या आधी विमानाच्या खिडक्या चौकोनी आकाराच्या होत्या. त्या काळात एरो विमाने मंद गतीने चालत असत आणि आजच्या तुलनेत थोडी कमी उडत असत.


मग आता 'या' चौकोनी खिडक्या गोल आकारात कधी बदलल्या? समजून घेऊ या


असे करण्यामागे अनेक कारणे आहेत, स्कॉट चिप फ्लाइटचे उत्पादन ऑपरेशन स्पेशलिस्ट विलिस ऑर्लॅंडो म्हणतात की, याचे पहिले कारण विमानाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. जेव्हा विमान आकाशात उडते, तेव्हा हवेचा दाब वाढतो. परंतु गोल खिडकीमुळे हा हवेचा दाब त्याच्या प्रत्येक भागावर सारखाच पडतो. जेव्हा असे होते, तेव्हा खिडक्या क्रॅक होण्याचा धोका कमी होतो.


- तसेच आकाशातील प्रवासादरम्यान विमानाच्या बाहेर आणि आतमध्ये हवेचा दाब जास्त असतो. गोलाकार खिडक्यांमुळे, उड्डाण दरम्यान हवेचा दाब वारंवार बदलल्यामुळे खिडक्या खराब होण्याचा धोका नगण्य राहतो. याशिवाय विमानाचा वेग वाढल्यामुळे आणि जास्त उंचीवर उड्डाण केल्यामुळे हा दाब अधिक होतो.


- 1950 पूर्वीची विमाने संथ गतीने धावत असत, त्यामुळे इंधन अधिक महाग होते आणि खर्चही जास्त होता. विमानाने प्रवास करण्याचा ट्रेंड वाढल्याने विमान कंपन्यांनी इंधनामुळे होणारा खर्च कमी करण्यासाठी वेग वाढवला. वेग वाढल्याने वाढलेला दाब कमी करण्यासाठी गोल खिडक्या बसवण्यात आल्या.


-यामागे आणखी एक कारण समोर आले आहे. चौकोनी खिडक्यांपेक्षा गोल खिडक्या अधिक सुंदर दिसतात. हा त्यांचा प्लस पॉइंट आहे. ज्यामुळे विमानाच्या डिझाईनला एक युनीक लूक दिसतो.