नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा एका व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये राष्ट्रगीत सुरु असताना भावूक झालेली ऐश्वर्या दिसत आहे. आईएमसी डब्ल्यूई प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी शबाना आझमी आणि सोनू निगम हेदेखील उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याच्या एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये राष्ट्रगीत सुरु असताना ऐश्वर्याचे डोळे भरून आल्याचे दिसत आहे. सुरुवातीला ऐश्वर्याने ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येऊ दिली नाही. मात्र, जेव्हा तिला फोटो काढण्यासाठी आग्रह करण्यात आला तेव्हा तिने डोळ्यातील अश्रू पुसले. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


२०१७ साली मेलबर्न येथे झालेल्या भारतीय चित्रपट महोत्सवात ऐश्वर्या रायला तिरंगा फडकावण्याचा मान मिळाला होता. यावेळी तिने उपस्थितांना संबोधितही केले होते.