मुंबई : भारतात नद्यांना फार महत्व आहे. आपल्याकडे त्यांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळेच लोकं नदीच्या काठावर जाऊन पूजा किंना अंघोळ करतात. ज्यामुळे पाप धुतले गेले असे लोकं मानतात. लोकं नदीची पूजा करतात, दिवे दान करतात. तर एकाद्या विशेष प्रसंगी नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. तसेच काही नद्यांचे पाणी हे पूजेमध्ये देखील वापरले जाते. तसेच नद्यांचे पाणी आपल्याला पिण्यासाठी मिळते. त्यामुळे फक्त पाण्यासाठीच नाही तर आपण धार्मिक कामातही नद्यांना महत्व देतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की आपल्याच देशात अशी एक नदी आहे, जिला लोकं हात लावणे ही टाळतात आणि तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात.


कर्मनाशा हे या नदीचे नाव आहे


गंगा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. पण सरस्वती, नर्मदा, यमुना सारख्या नद्यांनाही मोठे महत्त्व आहे. या नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी कुंभमेळा आयोजित केला जातो. 
असे असूनही उत्तर प्रदेशातील कर्मनाशा नदीच्या पाण्याला लोक हात लावत नाहीत. परंतु असे का केले जाते या मागचे कारण तुम्हाला माहितीय?


'कर्मनाशा' हा दोन शब्दांपासून बनला आहे. पहिला कर्म आणि दुसरा नशा. लोकांचे असे मानने आहे की, कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श केल्याने काम खराब होते आणि चांगली कामे मातीत मिसळतात. त्यामुळे लोक या नदीच्या पाण्याला हात लावत नाहीत. तसेच या कारणामुळेच ते कोणत्याही कारणासाठी वापरले जात नाहीत.


कर्मनाशा नदी बिहार आणि उत्तर प्रदेशमधून वाहते. या नदीचा बहुतांश भाग यूपीमध्येच येतो. उत्तर प्रदेशात ती सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाझीपूरमधून वाहते आणि बक्सरजवळ गंगेला मिळते. या नदीच्या आजूबाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसताना लोक फळे खाऊन उदरनिर्वाह करतात, पण या नदीचे पाणी वापरत नसत.


या मागील कारण काय?


पौराणिक कथेनुसार, राजा हरिश्चंद्राचे वडील सत्यव्रत यांनी एकदा त्यांचे गुरू वशिष्ठ यांच्याकडे शारीरिकरित्या स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण गुरूंनी नकार दिला. तेव्हा राजा सत्यव्रत यांनी गुरु विश्वामित्र यांना हीच विनंती केली. त्यावेळे  विश्वामित्राचे वसिष्ठाशी वैर असल्यामुळे त्यांनी सत्यव्रताला आपल्या जिद्दीच्या बळावर स्वर्गात पाठवले. हे पाहून इंद्रदेव क्रोधित झाले आणि त्यांनी राजाचे मस्तक कापून करून त्याला पृथ्वीवर पाठवले.


विश्वामित्राने आपल्या शक्तीने राजाला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये थांबवले आणि नंतर देवांशी युद्ध केले. या दरम्यान राजा सत्यव्रत आकाशात उलटे लटकत राहिले, त्यामुळे त्यांच्या तोंडातून लाळ पडू लागली. ही लाळ नदीच्या रूपात पृथ्वीवर आली. तर गुरु वशिष्ठांनी राजा सत्यव्रत याला त्याच्या दुष्टपणामुळे चांडाल होण्याचा शाप दिला.


लाळेने नदी निर्माण झाल्यामुळे आणि राजाला दिलेल्या शापामुळे ती शापित मानले जाते. याच कारणामुळे या नदीच्या जवळ कोणी जात नाही.