मुंबई : आपण अनेक चोरांबद्दल ऐकले असेल, तसेच चोरीचे अनेक CCTV फुटेज देखील पाहिले आहे. चोर चोरी करण्यात इतके माहिर असतात की, ते आपल्या हातचलाखीने काहीही करु शकतात. तुम्ही चोराने पैसे, दागिने, कार, वाहन, घरातील वस्तु चोरल्याचे ऐकले असेल. परंतु तुम्ही कधी चोराने अंडरवेअर चोरल्याचे ऐकले आहे का? तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटत असले, तरी ते हे खरं आहे आणि हे CCTV फुटेजमुळे खरं देखील ठरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर हे मलेशियातील प्रकरण आहे. जिथे एका परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर लोकांच्या घरातून पुरुषांची अंडरवेअर चोरीला जाण्याच्या घटना समोर येऊ लागल्या. या घटनेबाबत लोकांचा विश्वास बसत नव्हता. कारण घरात घुसून कोणी फक्त पुरुषांचे अंडरवेअर का चोरतील?  हे लोकांना समजत नव्हते.


लोकांच्या घरात घुसून इतकी रिस्क घेऊन कोणी फक्त अंडरवेअर का चोरेल असा लोकांकडून प्रश्न उपस्थीत केला जाऊ लागला. यानंतर जेव्हा या चोरट्याला पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तेव्हा हे खरं असल्याचं उघड झालं.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती फक्त पुरुषांचे अंडरवेअर चोरुन घेऊन जात आहे. परंतु त्याचा चेहरा या व्हिडीओमध्ये दिसलेला नाही. ज्यामुळे त्याला पकडण्यात आलेले नाही.



एवढा धोका पत्करून लोकांच्या घरात घुसून केवळ पुरुषांचे अंडरवेअर चोरणाऱ्या एका चोराविषयी जाणून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोक हा व्यक्ती असं का करत असाव याबाबत कारणं देत आहे.


परंतु असं करण्या मागचं कारण काय असेल, हे फक्त त्या चोरालाच माहित आहे. कारण कितीही विचार केला तरी हा व्यक्ती असं का करत असेल, यामागचं कारण कोणालाही कळलेलं नाही, ज्यामुळे चोराचं अंडरवेअर चोरी करण्याचं कारण हे सध्या तरी आपल्या कल्पनेच्या पलिकडे आहे असंच म्हणावं लागेल.