मुंबई : तुम्ही अनेकदा ऐकले असेल की फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सद्वारे अनेक अनोळखी लोक एकमेकांचे मित्र बनतात आणि बऱ्याचदा ही मैत्री नंतर प्रेमात बदलते. परंतु तुम्ही कधी ऐकले आहे की, PUBG गेम खेळताना कोणी प्रेमात पडलं आहे? खरंतर आपण बऱ्याच लोकांना PUBG  खेळताना आक्रमक होताना पाहिलं आहे. परंतु असे असताना देखील हा खेळ खेळता-खेळता एक मुलगी प्रेमत पडली आहे. एवढंच नाही तर ही मुलगी एका नाही तर दोन मुलांच्या प्रेमात पडली आहे आणि त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे त्या मुलीने दोघांनाही एकाच दिवशी भेटायला बोलावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमधील हल्दवानी येथून हे विचित्र प्रकरण समोर आले आहे. इथे राहणाऱ्या एका तरुणीला PUBG गेम खूप आवडायचा. ती ऑनलाइन पबजी गेम खेळायची. सुमारे दोन वर्षांपूर्वी PUBG गेम खेळताना तरुणीची राजस्थानमधील एका तरुणासोबत मैत्री झाली होती. यानंतर दोघांनीही आपले मोबाईल नंबर एकमेकांना शेअर केले आणि त्यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले.


अनेक दिवस फोनवर बोलणं झाल्यानंतर दोघांच्या मनात प्रेमाचं गुलाब फुललं, ज्यानंतर त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला.


आश्‍चर्याची बाब म्हणजे महिनाभरापूर्वी ऑनलाइन पबजी खेळत असताना तरुणीची उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे राहणाऱ्या आणखी एका तरुणाशी मैत्री झाली आणि ही मैत्री देखील प्रेमात बदलली.  यानंतर तरुणीने दोन्ही तरुणांना हल्द्वानीला भेटण्यासाठी बोलावले. या मुलीला भेटण्यासाठी दोन्ही तरुणांनी हल्दवानी गाठले.


दोन्ही तरुण समोरासमोर आल्यावर दोघांनीही त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड सांगण्यास सुरुवात केली. यावरून दोघेही एकमेकांशी भिडले आणि दोघांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.


हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचताच पोलिसांनी दोन्ही तरुणांना पकडून कोतवालीला आणले. शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही तरुणांवर कारवाई केली. यादरम्यान पोलिसांना या प्रकरणातील संपूर्ण वास्तव समोर आले.


पोलिसांनी सांगितले की, भोटिया पडव चौकी परिसरात राहणारी ही मुलगी दोन्ही मुलांसोबत प्रेमाचा खेळ खेळत होती. ही मुलगी दोन्ही तरुणांच्या PUBG गेमने इतकी प्रभावित झाली की दोघांसोबत देखील तिने प्रेमाचा खेळ खेळला.


मात्र, तरुणीने दोन्ही तरुणांना एकत्र का बोलावले, याचं उत्तर मात्र पोलिसांना कळू शकलेलं नाही. परंतु पोलिसांसमोर एक माहिती समोर आली ती, म्हणजे हे दोन्ही तरुण PUBG चे प्रो प्लेअर आहेत, या दोघांच्या खेळामुळे तरुणी त्यांच्याकडे आकर्षित झाली होती. यानंतर ती दोघांसोबत देखील प्रेमाचा हा खेळ खेळू लागली.