लखनऊ : प्रेम हे प्रेम असतं, ते कधी, कुठे, कसं आणि कोणाशी होईल याचा काही नेम नसतो. असे अनेक लोक आहेत, ज्यांनी प्रेमात सगळ्या हद्द पार केल्या आहेत. सध्या युपीमधील असंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकूण सर्वांनाच धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील एक काका त्याच्या पुतणीच्या प्रेमात पडला. एवढंच काय तर ती पुतणी देखील तिच्या काकांच्या प्रेमात होती. या दोघांनी शेवटी लग्न करण्याचं ठरवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यानंतर त्यांनी ही गोष्ट आपल्या कुटुंबीयांसमोर मांडली. परंतु कुटुंबीयांनी लग्न करण्यासाठी पूर्णपणे नकार दिला. ज्यानंतर एकमेकांच्या प्रेमातपुर्ते बुडालेल्या या काका -पुतणीच्या जोडप्याने टोकाचा निर्णय घेतला.


या दोघांच्या लग्नासाठी कुटुंबीय तयार नसल्यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला.


हे प्रकरण लालौली भागातील मुत्तौर गावातील आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कारण या काका आणि पुतणीने टोकाचं पाऊल उचललं.


सोबत जगता येत नसेल, तर सोबत मरु शकतो असा विचार त्यांनी केला आणि आपलं आयुष्य संपवलं. प्रेमी युगुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबाची अवस्था हलाखीची झाली आहे. काका आणि भाचीमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.


घरच्यांच्या दबावानंतर काका सुरतला निघून गेले होते. परंतु जेव्हा त्यांना कळले की, त्यांच्या पुतणीचे म्हणजेच प्रेयसीचे लग्न जमले आहे. तेव्हा ते पुन्हा घरी आले. ज्यानंतर या दोघांनीही आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.