मुंबई : एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, एका महिलेला तिच्या नवऱ्याने आणि घरच्यांनी फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून तिनं आत्महत्या केली. हे प्रकरण कानपूरमधील आहे आणि या महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली. परंतु एक फोन कसं कोणच्याच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरु शकतं हा मोठा प्रश्न उपस्थीत होतो. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर पतीसोबत भांडण होऊन महिलेने आत्महत्या केली. हे प्रकरण बिधनू खेरसा गावातील आहे. गावातील पप्पूचा २५ वर्षीय मुलगा महेंद्र याचे तीन महिन्यांपूर्वी कारबिंगवन येथील २२ वर्षीय मुलगी चांदनी हिच्याशी लग्न झाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पती-पत्नीमध्ये वाद झाला, त्यानंतर संतापलेल्या महिलेने गळफास लावून घेतला.


खरेतर पतीने महिलेला रोज रात्री फोनवर बोलण्यासाठी अडवणूक केली होती. याआधीही अनेकदा त्याने पत्नीला यासाठी रोखले होते. मात्र, यावेळी सासरी आलेल्या महिलेचे वडील आणि भावाला ही बाब कळताच त्यांनीही महिलेला अडवले.


मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी महिलेने माहेरून एक फोन सोबत आणला होता. लग्न झाल्यापासून ती रोज रात्री कोणाशी तरी फोनवर बोलायची. तिच्या पतीने तिला अनेक वेळा अडवले. तरीही ही महिला ऐकायला तयार नव्हती. शेवटी या महिलेच्या नवऱ्याने तिच्या वडिलांना आणि भावाला बोलावले.


त्यानंतर वडिलांनी जाऊन महिलेला शिवीगाळ केली.  सोबतच वडिलांचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वीही ही महिला असेच करायची. महिलेच्या भावानेही तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले.


वडील आणि भावाला शिवीगाळ केल्यानंतर महिलेने आपण पुन्हा असे करणार नाही, असे सांगून खोलीत गेली. रात्रीचे जेवण करून सगळे झोपायला गेले. परंतु मंगळवारी जेव्हा सगळे उठले, तेव्हा मात्र ही महिला गळफास लावलेली दिसली.


खरंतर तिचा नवरा जेव्हा झोपेतुन उठला तेव्हा त्याने पाहिले की, या महिलेनं स्वत:ला आपल्या साडीने गळफास लावून घेतला.


हा प्रकार कळताच महिलेच्या भावाने पतीवर खुनाचा आरोप करत खळबळ उडवून दिली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.