मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या `वायरल` लग्नामागचं सत्य...
स्टार कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मागोमाग सर्वात चर्चेचा विषय ठरलाय तो उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचं `वायरल लग्न`...
मुंबई : स्टार कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मागोमाग सर्वात चर्चेचा विषय ठरलाय तो उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचं 'वायरल लग्न'...
वायरल लग्न यासाठी की सध्या, सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या कथित लग्नाची पत्रिका वायरल झालीय... ही पत्रिकाही जोरदार चर्चेत आहे... कारण एक पत्रिका तब्बल दीड लाख रुपयांची असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येतोय.
परंतु, हा दावा खोटा असल्याचं 'रिलायन्स'नं अधिकृतरित्या जाहीर केलंय. 'सोशल मीडियवर गेल्या काही दिवसांपासून एक फेक व्हिडिओ फिरतोय... यात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांच्या लग्नाचं खोटं कार्ड दाखवण्यात येतंय... हे संपूर्णत: खोटं असल्याचं आम्ही स्पष्ट करतोय... अशी कोणतीही माहिती शेअर करू नये' असं रिलायन्सनं जाहीर केलंय.