Alert! तुम्ही Cheque Payment करत असाल तर सावधान, ही चूक कधीही करु नका
जर तुम्ही कोणालाही चेकने पैसे देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
मुंबई : जर तुम्ही कोणालाही चेकने पैसे देत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता तुम्हाला कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला चेक देण्यापूर्वी अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत, जे 1 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. मध्यवर्ती बँकेने राष्ट्रीय स्वयंचलित क्लिअरिंग हाऊस (NACH) २४ तास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्येही लागू असेल.
या नवीन नियमानुसार, आपला चेक सुट्टीच्या दिवशीही क्लिअर केला जाईल. त्यामुळे क्लिअरन्ससाठी लागणारा वेळ कमी होईल, परंतु त्यामुळे लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण आता शनिवारी जारी केलेले चेक रविवारी देखील क्लिअर केले जाऊ शकतो.
म्हणजेच, चेकच्या क्लिअरन्ससाठी तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम शिल्लक ठेवणे गरजेचे असणार आहे. अन्यथा तुमचा चेक बाउन्स झाल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. पूर्वी चेक देताना, ग्राहकाला माहित होते की, हा चेक सुट्टीनंतरच क्लिअर होईल, परंतु आता तसे नाही. आता हा चेक सुट्टीच्या दिवशीही क्लिअर केला जाऊ शकतो.
NACH म्हणजे काय?
NACH ला नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) म्हणतात. हे देशातील नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे चालवले जाते. बल्क पेमेंट सहसा याद्वारे केले जाते.
NACH ही एक अशी बँकिंग सेवा आहे. ज्याद्वारे कंपन्या आणि सामान्य माणूस त्यांचे प्रत्येक महिन्याचे प्रत्येक पेमेंट सहज आणि कोणत्याही तणावाशिवाय पूर्ण करू शकतात. हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे चालवले जाते.
NACH आदेशाचे दोन प्रकार आहेत
याचा एक प्रकार म्हणजे NACH डेबिट आहे. हे सहसा टेलिफोन बिल भरणे, म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपी आणि वीज बिल भरण्यासाठी वापरले जाते.
त्याचवेळी, दुसरे म्हणजेच NACH क्रेडिट आहे. NACH क्रेडिट पगार, व्याज, पेन्शन आणि लाभांश देण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच आता या सर्व सुविधा मिळवण्यासाठी तुम्हाला सोमवार ते शुक्रवार वाट पाहावी लागणार नाही, ही कामे वीकेंडलाही केली जातील.