Isha Ambani Anand Piramal Twins : रिलायन्स उद्योग समूहाला (Reliance Group of industries) व्यवसाय क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात सध्या आनंदाची उधळण झाली आहे. निमित्त आहे, ते म्हणजे ते पुन्हा एकदा आजोबा होण्याचं. अंबानींची लेक ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल (anand Piramal) यांनी नुकतंच जुळ्या मुलांचं स्वागत केलं. एक मुलगा आणि एक मुलगी, अशा गोंडस बाळांचं मातृत्त्वं ईशानं स्वीकारलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांच्या जन्मानंतर आता ईशा पुन्हा एकदा रिलायन्स उद्योग समूहातील retail businesses विभागाकडे लक्ष केंद्रीत करणार आहे. खुद्द मुकेश अंबानी यांनीच लेकिवर ही जबाबदारी सोपवली होती. 


संपत्तीचा आकडा डोळे दिपवणारा 


$100 million इतकी अरबोंची संपत्ती असणारी (Isha Ambani) ईशा व्यवसाय क्षेत्रात इतक्या मोठ्या हुद्द्यावर असणारी अंबानी कुटुंबातील सर्वात पहिली महिला आहे. विश्वास बसणार नाही, पण वयाच्या 16 व्या वर्षी ईशा जगातील सर्वात कमी वयाच्या अरबपतींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होती. 


कुठे झालं शिक्षण? (Education)


ईशाचं प्राथमिक शिक्षण मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल येथे झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला (America) गेली. तेथील येल युनिवर्सिटीतून तिनं मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं. पुढे तिनं स्टॅनफर्डच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिजनेसमधून MBA चं शिक्षण घेतलं. 


वाचा : Ambani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!


 


आजच्या घडीला ईशाची संपत्ती तब्बल 800 कोटी 


अमेरिकेत असणाऱ्या मॅकिन्जे कंपनीत बिजनेस अॅनालिस्ट म्हणून ईशानं नोकरीपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 2014 मध्ये तिला Reliance Board मध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं. ईशाच्या संपत्तीचा आकडा अंदाजे 800 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं. 


सध्या ही Superwoman ईशा मुलांच्या संगोपनावर लक्ष देईल, हो पण अरबपती आईची ही लेकरं जन्मापासूनच अरबपती आहेत, असं म्हणायला हरकत नाही.