नवी दिल्ली : चीनकडून सीमेवर सुरु असेलेल्या वाढत्या तणावाबाबत मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैठकीबाबतीत लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना याची माहिती दिली गेली आहे. बैठकीत सीमेवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावाबाबत चर्चा होणार आहे. 


डोकलामच्या विषयावर भारत आणि चीन यांच्याच तणावपूर्ण वातावरण आहे. चीनकडून सतत प्रक्षोभक विधानं केली जात आहेत. चीनच्या एका सरकारी वृत्तपत्रात भारतात सरळ सरळ धमकी देत म्हटलं आहे की, 'परिस्थिती आणखीच बिकट होईल त्याआधी भारताने डोकलाममधून आपलं सैन्य मागे घ्यावं.' वृत्तपत्रात असं ही म्हटलं आहे की, 'बीजिंग कोणत्याही प्रकारची तडजोड नाही करणार.'