चंदीगड : पंजाबमध्ये प्री नर्सरीपासून बारावीपर्यंतचे सर्व शाळा बंद करण्यात आली आहेत. राज्यातील कोरोनामधील परिस्थितीमुळे पंजाब सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर आज रात्रीपासून मोहाली, लुधियाना, पटियाला येथेही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे शिक्षणमंत्री विजय इंदर सिंगला यांनी शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाची पुष्टी केली आहे. मुलांच्या परीक्षा आणि कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विजय इंदर सिंगला म्हणाले. यावेळी परीक्षा सुरू राहतील. पंजाबमध्ये कोरोना विषाणूचे प्रकरणं सतत वाढत आहे. कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या 10 हजारांच्या वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोना प्रकरणात वाढ झाल्यानंतर विविध शहरांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.


आज रात्रीपासून लुधियाना, पटियाला आणि मोहालीमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या शहरांमध्ये सकाळी 11 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू राहील. याबरोबरच राज्यातील इतर भागातही शासन आणि प्रशासनाकडून कर्फ्यूचा विचार केला जात आहे. जे कोरोना विषाणूसंदर्भात सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.


शुक्रवारीही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने सरकार आता गंभीरपणे निर्णय घेत आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध आणत आहे. गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. याशिवाय स्थानिक प्रशासनला परिस्थितीनुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.