नवी दिल्ली : लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान हिंसक झडप नंतर सुरक्षा दलाचे तिन्ही दल पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3500 किलोमीटरच्या चीनच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही सैन्य हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. चीनला उत्तर देण्यासाठी हिंद महासागरातही नौदलाने तयारी केली आहे.


सैन्याने सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व लडाखच्या लाइन ऑफ एक्च्युअल कंट्रोल (एलएसी) वर आपल्या सर्व प्रमुख फ्रंट-लाईन ठिकान्यांव्यतिरिक्त इतर जवानांना रवाना केले आहे. वायुसेनाने प्रथम आपल्या सर्व अग्रभागी रेषेत एलएसी आणि बॉर्डर भागावर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट स्तर वाढवला आहे.


सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान झडप झाली. या झडपमध्ये भारतीय सैन्यात 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे देखील जवळपास 40 सैनिक मारले गेले.


सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने आधीच या हल्ल्याची योजना आखली होती. त्यांनी दगडी, काठ्यांना खिळे आणि तार या ठिकाणी आणून ठेवले होते.


चीन ड्रोनच्या माध्यमातून भारतीय सैन्यावर लक्ष ठेवत होता. परंतु भारताच्या जवानांसोबत लढणं त्यांना महागात पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दात चीनला उत्तर दिलं आहे. सीमेवर कोणत्याच प्रकारची चुकी माफ केली जाणार नाही. सीमेवर चीनला षडयंत्र आता महागात पडू शकतं.


बुधवारी रात्री पंतप्रधान निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. लडाख मधील परिस्थितीवर या दरम्यान चर्चा झाली. तर पंतप्रधान मोदींनी 19 जून रोजी सर्वपक्षांची बैठक बोलवली आहे.