All women entitled to safe And legal abortion: भारतात आता अविवाहित महिलांनाही MTP कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतर अविवाहित महिलांना 24 आठवड्यांच्या आता गर्भपात करण्याचा अधिकार मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी कायद्याच्या (MTP) नियमात 3-B चा विस्तार केला आहे. आतापर्यंत 20 आठवड्याहून अधिक आणि 24 आठवड्यांआधी गर्भपात करण्याचा अधिकार फक्त विवाहित महिलांना होता. आता हा नियम अविवाहित महिलांनाही लागू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की, "कलम 21 अंतर्गत प्रजनन स्वातंत्र्य, सन्मान आणि गोपनीयतेचा अधिकार अविवाहित स्त्रीला विवाहित स्त्रीप्रमाणेच आहे. 20-24 आठवड्यांच्या दरम्यान गर्भधारणा असलेल्या एकल किंवा अविवाहित गर्भवती महिलांना गर्भपात करण्यास मनाई करणे, तर अशा परिस्थितीत विवाहित महिलांना गर्भपात करण्याची परवानगी देणे हे घटनेच्या कलम 14 च्या भावनेचे उल्लंघन होईल."



महिला विवाहित असो वा अविवाहित, तिला MTP कायद्यांतर्गत गर्भधारणेच्या 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने सांगितले की, गर्भपाताचा उद्देश स्थापित करण्यासाठी बलात्कारामध्ये वैवाहिक बलात्काराचाही समावेश होतो.


सुप्रीम कोर्टाने 25 वर्षीय अविवाहित तरुणीच्या याचिकेवर महिला हक्कांबाबतचा मोठा निर्णय दिला आहे. 24 आठवड्यांच्या गरोदरपणाचा गर्भपात करण्यासाठी हायकोर्टाकडे परवानगी मागितली होती. दिल्ली हायकोर्टाने परवानगी दिली नाही. संमतीने सेक्स केल्यामुळे ही महिला गरोदर राहिली होती.