रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : जस्टिस चेलमेश्वर यांनी केसेस हस्तांतरणात भेदभाव केला जात असल्याचा आरोप मुख्य सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यावर केला आहे.


न्यायाधीशांनी पैसे खाल्ल्याचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुद्दा १ - मेडिकल प्रवेश संदर्भातले एका केस मध्ये न्यायाधीशांनी पैसे खाल्ल्याचा आरोप वकील प्रशांत भूषण यांनी केला होता. एफआयआर मध्ये तसा उल्लेख असल्याचे सांगितले. यांतील तथ्य बाहेर येण्यासाठी जस्टीस चेलमेश्वर यांनी पाच जजेस चे खंडपीठ स्थापन केले. परंतु सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी जस्टीस अरूण मिश्रा यांचे खंडपीठ स्थापन करून चेलमेश्वर यांचा आदेश रद्दबातल ठरवला. चेलमेश्वर यांना असे खंडपीठ स्थापन करण्याचा अधिकार नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला. जस्टीस चेलमेश्वर नाराज झाले. इथेच वादाची ठिणगी पडली.


जस्टीस लोया यांची संशयास्पद हत्या


मुद्दा २ - जस्टीस लोया यांची संशयास्पद हत्या झाली असल्याचा आरोप होत आहे. त्यासंबंधी केस सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी  जस्टीस अरूण मिश्रा यांच्याकडे सोपविली. अरूण मिश्रा यांच्याकडेच संवेदनशील प्रकरणे का सोपविली जातात, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


ठराविक केसेस मध्ये रूची


मुद्दा ३ : याकुब मेमन संदर्भातील प्रकरण सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी स्वत: कडे घेतले. त्याच मुंबई हल्ल्यातील आणखी एका आरोपीचे प्रकरण दिपक मिश्रा यांनी स्वत: कडे घेतली आहे. यामुळे ठराविक केसेस मध्ये रूची का आहे, असा प्रश्न निर्माण केला जात आहे.


भाजप सरकारला अडचणीत आणणारे केसेस


मुद्दा ४ : भाजप सरकारला अडचणीत आणणारे केसेस ठराविक जस्टीस कडे दिले जात आहेत. यातून सरकारला मदत होते आहे. सरकार काही लोकांच्या माध्यमातून आपला अजेंडा राबवीत असल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याची खंत व्यक्त केली जात आहे.