Minister Govind Gaude: गोव्यातील कथित ऑडिओ क्लीप प्रकरणाच मोठी अपडेट समोर आली आहे.  भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांच्या अडणीत आणखी वाढ होणार आहे. गौडे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांना धमकावल्या प्रकरणी काँग्रेसने त्यांच्यावर तक्रार दाखल केली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष रमेश तवाडकर यांनीच कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांच्यावर फंडाचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता. यानंतर  मंत्री गोविंद गौडे यांच्या कथित ऑडिओ क्लीपमुळे खळबळ उडाली आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण


गोविंद गौडे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची कथित धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष रामकृष्ण जाल्मी यांनी ही लेखी तक्रार दिली आहे. या प्रकरणी एसडीपीओ पणजी सखोल तपास करणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.


नेमका काय संवाद आहे कथित ऑडिओक्लीपमध्ये?


गौडे आणि अनुसूचित जमाती कल्याण विभागाचे संचालकाच्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये गौडे हे अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौडे यांनी एससी, एसटी आयोगाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला जात आहे. काँग्रेसने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत या सर्व आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


काँग्रेस नेते जाल्मी यांनी ऑडिओ क्लिपचीही चौकशी करण्याची  केली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये गौडे हे कथितरित्या एससी, एसटी आयोगाच्या जागरूकतेसाठी काही निधी देण्यासाठी रेडकर यांना धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल ऑडिओ क्लीपनंतर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. मंत्री गोविंद गौडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.