मुंबई : पंजाबचे माजी मुख्यमंत्री (Punjab former cm) आणि पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी भाजपमध्ये आपला पक्ष विलीन केला आहे. त्याआधी कॅप्टन यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (J P Nadda) यांची भेट घेतली. 22 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन केला होता. त्यानंतर आता त्यांनी आपला नवा पक्ष भाजपमध्ये (BJP) विलीन केलाय. 30 वर्षांपूर्वी 1992 मध्ये अकाली दल (Akali Dal) सोबत संबंध तोडून त्यांनी शिरोमणी अकाली दल (पंथिक) ची स्थापना केली. 6 वर्षांनंतर 1998 मध्ये कॅप्टन यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election) कॅप्टन यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचा स्वत:चा देखील पराभव झाला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली होती. काँग्रेसने नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे प्रमुख केल्याने ते नाराज होते. त्यानंतर सिद्धू यांनी आमदारांना आपल्या बाजुने करायला सुरुवात केली आणि ताकद दाखवून काँग्रेस हायकमांडवर दबाव आणला. सप्टेंबर 2021 मध्ये चरणजित सिंह चन्नी यांची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.



कॅप्टन यांच्या पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढवली होती. पण पंजाबमध्ये आपची जादू चालल्याने काँग्रेससह सगळ्याच पक्षांना पराभवाचा मोठा सामना करावा लागला. 


कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे की, त्यांना महाराष्टाचे राज्यपाल (Governor of Maharashtra) बनवलं जावू शकतं. मात्र याबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती नाही.