Amarnath Yatra 2022 ची घोषणा, कोरोनामुळे 2 वर्ष बंद होती अमरनाथ यात्रा
Amarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांनासाठी खूशखबर आहे. 2 वर्षानंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे.
Amarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra 2022 ) ची प्रतिक्षा संपली आहे. कारण आता अमरनाथ यात्रा 30 जून 2022 पासून सुरु होणार आहे. रविवारी जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) राज्याच्या उपराज्यपाल कार्यालयाने याबाबत माहिती दिली. अमरनाथ यात्रा कोविड प्रोटोकॉल्स (Amarnath Yatra Covid Guidelines)सह सुरु होणार आहे. अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार आहे.
2 एप्रिलपासून नोंदणी
कोरोनामुळे दोन वर्ष बंद असलेली अमरनाथ यात्रा 30 जून पासून सुरु होणार आहे. श्राइन बोर्डाच्या माहितीनुसार, ज्यांना अमरनाथ यात्रा करायची आहे. त्यांना 2 एप्रिलपासून नोंदणी करता येणार आहे. एका दिवसाला फक्त 20 हजार लोकांनाच परवानगी असणार आहे.
गाईडलाईन्स जारी
अमरनाथ यात्रेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या प्रवासाला फक्त तेच भाविक जाऊ शकतील, ज्यांचे वय 16 ते 65 वर्षांच्या दरम्यान असेल. अमरनाथ यात्रा 2022 साठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. यासोबतच प्रवाशांना प्रवासासाठी फिटनेस प्रमाणपत्रही आवश्यक असणार आहे.
अमरनाथ यात्रा ही सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक सर्वात कठीण यात्रा आहे. अमरनाथ यात्रेची चढण दोन मार्गांनी केली जाते. पहिला मार्ग पहलगाम मार्गे जातो तर दुसरा मार्ग बलदाल मार्गे जातो. हे दोन्ही मार्ग नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवासापूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात असते.
ताज्या बातम्या, लाइव्ह बातम्या अपडेट्ससाठी फॉलो करा 24taas.com