Amazon Great Indian Festival 2022: पारंपारिक लूकचा (Traditional look) विचार केल्यास बनारसी साड्या (Banarasi sarees) नेहमीच यादीत प्रथम क्रमांकावर असतात. या साड्यांमुळे तुमच्या विंटेज स्टाइलला (Vintage style) एक चांगलाच लूक येतो.  (Amazon Great Indian Festival 2022 Reveal Your Beauty in Banarasi Saree Easily recreate the look nz)


आणखी वाचा - कॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


लग्न असो किंवा दिवाळी पार्टी, बनारसी साडी कोणत्याही एथनिक लुकसाठी (Ethnic look) योग्य असते. Amazon Great Indian Sale तुमच्यासाठी बनारसी साड्या घेऊन येत आहे ज्या तुम्ही मोठ्या डिस्काउंट्ससह (Discount) परवडणाऱ्या किंमतीत खरेदी करू शकता आणि मौनी रॉय, कीर्ती सुरेश आणि चित्रांगदा सिंग यांचे लुक (Look) तुम्ही स्वता:वर तयार करु शकता. तर पाहूया बनारसी साड्या...


1. कीर्ति सुरेश (Kirti Suresh)


तुमच्या कलेक्शनमध्ये बनारसी साड्यांचा समावेश करण्याची कोणतीही योग्य किंवा चुकीची वेळ नाही, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्या खरेदी करू शकता आणि घालू शकता. या फोटोमध्ये कीर्ती सुरेशनं शांती बनारसची बनारसी सिल्क साडी घातली आहे. या साडीवर सोनेरी आणि हिरव्या रेषा आहेत. त्याचवेळी किर्तीने साडीसोबत सोनेरी रंगाचा ब्लाउज निवडला आहे. किर्तीचे सोन्याचे दागिने, स्लीक बन आणि गजरा तिचा हा अप्रतिम लुक तयार करतात.



आणखी वाचा - Fever at night : तुम्हालाही फक्त रात्री ताप येतो? कारणं ऐकून तुम्ही हादराल


 


2. चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh)


लाल रंग कधीही वाईट दिसू शकत नाही. या सुंदर लाल बनारसी साडीत चित्रांगदा सिंगचे सौदंर्य झळकत आहे. चित्रांगदा ही साडी अतिशय सुंदर आणि फॅशनेबल स्टाईलमध्ये कॅरी करताना दिसत आहे. गोल्ड फ्लोरल डिझाईनची साडी परफेक्ट विंटेज लुक देत आहे. तिथेच. चित्रांगदाने गोल्ड बोट नेकसह सिक्विन ब्लाउजमध्ये बोल्ड लूक (Bold Look) देण्याचा प्रयत्न केला आहे. तिने या साडीसोबत भरदार ज्वेलरी घातली आहे, ज्यामुळे लूक पूर्ण होतो.



3. मौनी रॉय (Mouni Roy)


मौनी रॉयला एकामागून एक सुंदर साड्यांमध्ये पाहून लोक तिला साडी गर्ल (Saree Girl) म्हणू लागले आहेत. मौनीने नुकतीच ही सुंदर हिरवी बनारसी साडी नेसली होती. फोटोमध्ये मौनी रॉयनं ब्लाउजशिवाय ही साडी घातली आहे. केस मोकळे ठेवून तिने या लूकसाठी पारंपरिक दागिन्यांची (Traditional jewelry) निवड केली आहे.