Amazon Prime Day 2020: 6 आणि 7 ऑगस्टला विविध वस्तूंवर ऑफर
Amazon वर मिळणार विविध ऑफर्स
मुंबई : अॅमेझॉन इंडियाने बुधवारी 'मॉन्सून अप्लायसेस स्टोअर' सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये घर आणि स्वयंपाकघरातील उपकरणासह अन्य मोठ्या उपकरणांवर सूट मिळेल. ग्राहक त्यांच्या आवडीच्या ब्रँडवर 26 जुलै पर्यंत चांगल्या ऑफर घेऊ शकतात. Amazon अॅमेझॉनच्या 'मॉन्सून अप्लायन्स स्टोअर' सेलमध्ये आयसीआयसीआय (ICICI) क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून ईएमआय व्यवहारांवर 1,500 रुपयांपर्यंतची त्वरित सवलत मिळेल. सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल आणि इतर मोठ्या ब्रॅण्ड्सना या विक्रीत मोठी सूट मिळू शकते. या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर, ईएमआय पर्याय यासारख्या ऑफर देखील आहेत. या सेलमध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर यासारख्या वस्तू 50 टक्क्यांपर्यंत सवलतीत खरेदी करता येतील.
फ्रंट लोड वॉशिंग मशीन 16,999 रुपयांपासून सुरु होते. तर टॉप लोड वॉशिंग मशीन 10,999 रुपयांपासून खरेदी करता येतील. सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 7,149 रुपयांपासून खरेदी करता येऊ शकते.
Amazon Prime Day 2020 सेल
दुसरीकडे वॉटर प्युरिफायर्सवर 50 टक्के सूट आहे. 11,500 रुपयांपासून तुम्ही ते खरेदी करु शकता. याशिवाय रेफ्रिजरेटरवर नो कॉस्ट ईएमआई आणि एक्सचेंज ऑफर्स आहेत. साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्सवर कमीतकमी 40 टक्के पर्यंत सूट आहे. बेस्ट सेलिंग एयर कंडीशनर 1,799 रुपये प्रति महिन्याच्या इएमआयवर खरेदी करता येऊ शकते. नो-कॉस्ट ईएमआई, एक्सचेंज ऑफर आणि शेड्यूल्ड डिलिवरी सारखे पर्याय यामध्ये देण्यात आले आहेत. 17,499 रुपयांपासून एसी देखील खरेदी करता येऊ शकते.