वॉशिंग्टन : फेसबुकनंतर आणखीन एक अमेरिकन कंपनी असलेल्या 'अमेझॉन'च्या अडचणींत आपल्याच देशात वाढ होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठ्या कंपनीला जोरदार झटका दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेझॉनविरुद्ध अमेरिकेत 'टॅक्स ट्रिटमेंट' गरजेची असल्याचं वक्तव्य केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर काही मिनिटांतच अमेझॉनची मार्केट व्हॅल्यू जवळपास ४५ अरब डॉलर घसरली. भारतीय चलनाच्या हिशोबात सांगायचं तर अमेझॉनला जवळपास २.९० लाख करोड रुपयांचा झटका बसला. 


'अमेझॉन'वर नवा टॅक्स?


सीएबीसीच्या एका रिपोर्टनुसार, अमेझॉन आपल्यापेक्षा लहान व्यवसायांना नुकसानीत ढकलत आहे. त्यामुळे शॉपिंग मॉल्स आणि रिटेलर्सना मोठं नुकसान सोसावं लागतंय... यामुळे अमेझॉनवर नवा टॅक्स लावला जाऊ शकतो. 


अमेझॉनच्या शेअर्समध्ये झालेली घरसण आणि कंपनीची मार्केट व्हॅल्यू कमी झाल्यानं अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीवरही मोठा परिणाम झालाय. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडिक्सनुसार, सध्या त्यांची संपत्ती जवळपास ३.५ अरब डॉलर्सनं (२३ हजार करोड रुपये) घटलीय.


अद्याप कारवाई नाही


ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अद्याप अमेझॉनविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु, यापूर्वीही ट्रेजरी सेक्रेटरी स्टीवन म्युशिन यांनीही अमेझॉनवर सेल्स टॅक्स लावण्याची शिफारस केली होती.